सरकारी नोकरी म्हणजे ग्रॅज्युएशन हवंच असा अनेकांचा समज असतो पण दहावी आणि बारावीनंतरही अनेक सरकारी खात्यांमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी असतात. सुरुवातीला अगदी छोट्या पदाची संधी असली तरी विभागीय परीक्षा देऊन प्रमोशन घेता येतं. याच स्पर्धा परीक्षा आणि विविध संधींची माहिती
स्टाफ सिलेक्शन कमिशन
कम्बाइन्ड हायर सेकंडरी लेव्हल एक्झामिनेशन -
( डेटा एण्ट्री ऑपरेटर व लोअर डिव्हिजन क्लार्क भरती)
स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत केंद्र सरकारच्या विविध ऑफीसमध्ये डेटा एण्ट्री ऑपरेटर व लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी भरती केली जाते . या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना काही वर्षांनी विभागीय परीक्षा देऊन प्रमोशन घेता येतं. या भरती परीक्षेतून उमेदवार २ गटात (एक्स व वाय)मध्ये नोकरीसाठी पसंती देऊ शकतात .
ग्रुप एक्स :
यात निवडलेले उमेदवार खालील ऑफिसमध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क म्हणून काम करू शकतात .
आर्म्ड फोर्सेस हेडक्वार्टर्स
निवडणूक आयोग
इंटेलिजन्स ब्युरो
कोस्ट गार्ड
इंडियन फॉरेन सर्व्हिस
सीबीआय
राष्ट्रपती सचिवालय
संसदीय कामकाज मंत्रालय
केंद्रीय दक्षता आयोग
ग्रुप वाय :
यातले उमेदवार खालील ऑफिसमध्ये डेटा एण्ट्री ऑपरेटर म्हणून काम करू शकतात.
कॅग
लेखा परीक्षक
संरक्षण दले लेखा विभाग
शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी उत्तीर्ण
वयोमर्यादा - १८ ते २७ वर्षे.
परीक्षा फी : १०० रुपये ( महिला तसेच एससी , एसटी व अपंग उमेदवारांना फी नाही )
विद्यार्थी प्रवेश अर्ज संबंधित विभागीय ऑफिसमध्ये अर्ज पाठवू शकतात किंवा ऑनलाइन भरू शकतात विद्यार्थ्यांनी केवळ एकच अर्ज भरावा. त्यापेक्षा जास्त अर्ज भरल्यास परीक्षेला बसता येणार नाही. महाराष्ट्राचं विभागीय केंद्र मुंबईला असून परीक्षा केंद्र औरंगाबाद , मुंबई , कोल्हापूर , नागपूर , पुणे , नाशिक , अमरावतीला आहेत.
स्टाफ सिलेक्शन कमिशन (पश्चिम विभाग)
हेल्प लाईन नं -
निवड प्रक्रिया -
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा , स्कील टेस्ट (डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी) , टायपिंग टेस्ट (लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी) द्वारे केली जाते
लेखी परीक्षा -
लेखी परीक्षा २०० गुणांची असून पेपरचं स्वरुप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असते. २ तासांचा वेळ असतो. पेपर इंग्रजी व हिंदी माध्यमातून उपलब्ध असतील. कार्मिक व प्रशिक्षण विभागाची मान्यता मिळाल्यास तसेच प्रिंटींग व तज्ञांची उपलब्धता झाल्यास या परीक्षेचे पेपर्स मराठी वा इतर भाषेतून तयार केले जातील असं कमिशनच्या जाहिरातीमध्ये नमूद केले आहे. लेखी परीक्षेत चार विषयावर प्रत्येकी ५० गुणांचे प्रश्न विचारले जातात. चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातात.
विषय
सामान्य बुध्दीमापन
इंग्रजी भाषा
क्वांटीटिटीव्ह अॅप्टिटयुड ( अंकगणितीय क्षमता)
सामान्य ज्ञान
स्कील टेस्ट-
डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना स्कील टेस्टसाठी बोलावलं जाते. स्कील टेस्टमध्ये १५ मिनिटं इंग्रजी भाषेत टायपिंग करायला सांगितलं जातं. टायपिंगचा वेग तासाला ८००० की डिप्रेशन असायला हवा. त्यात केवळ पास होणं आवश्यक आहे. त्याला वेगळे गुण नसतात.
टायपिंग टेस्ट -
लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना टायपिंगच्या परीक्षेसाठी बोलावले जाते. ही टेस्ट हिंदी किंवा इंग्लीशची असते. इंग्लीश टायपिंगचा वेग ३५ शब्द प्रती मिनिट तर हिंदीचा वेग ३० शब्द प्रती मिनिट असावा लागतो. टायपिंगची परीक्षा कम्प्युटरवर घेतली जाते त्यात १० मिनीटात दिलेला उतारा टाइप करायचा असतो.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
क्लार्क-टायपिस्ट ( इंग्रजी - मराठी)
मंत्रालयीन विभाग व मुंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील क्लार्क आणि मराठी व इंग्रजी टायपिस्ट या गट क संवर्गातील भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परीक्षा घेण्यात येते.
वयोमर्यादा -
किमान १८ वर्षे व कमाल ३३ वर्षे.
शैक्षणिक पात्रता -
दहावी पास
क्लार्क-टायपिस्ट (मराठी) साठी मराठी टायपिंग वेग ३० शब्द प्रति मिनिट
तर क्लार्क-टायपिस्ट (इंग्रजी)साठी इंग्रजी टायपिंग वेग ४० शब्द प्रति मिनिट हवा.
उमेदवाराला मराठी बोलता , वाचता व लिहीता येणं गरजेच आहे.
परीक्षा टप्पे -फक्त लेखी परीक्षा घेतली जाईल.
लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असून ४०० गुणांसाठी २०० प्रश्न असतील. वेळ दोन तास असेल. इंग्रजी विषयाकरिता इंग्रजी माध्यम तर अन्य सर्व विषयांसाठी मराठी माध्यम असेल.
अभ्यासक्रम
मराठी - व्याकरण , सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.
इंग्रजी - स्पेलिंग , व्याकरण , सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.
सामान्यज्ञान - दैनंदिन घटना , नेहमीचे अनुभव , धर्म , साहित्य , राजकारण , शास्त्र , सामाजिक व औद्योगिक सुधारणा , क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्ये , सर्वसाधारणपणे , भारताच्या विशेष करुन महाराष्ट्राच्या इतिहासाची व भूगोलाची रुपरेषा यावरील प्रश्न.
बुध्दिमापन विषयक प्रश्न - उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करु शकतो , हे आजमावण्यासाठी प्रश्न.
अंकगणित - बेरीज , वजाबाकी , गुणाकार , भागाकार , दशांश अपूर्णांक , सरासरी व टक्केवारी.
क्लार्क व टायपिस्ट पदांसाठीची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून केली जाते. यासाठी महाराष्ट्रातील शासकीय परीक्षा मंडळाची टायपिंग परीक्षा पास असणं आवश्यक असतं. नुसतंच टायपिंग येऊन उपयोग नाही