शुक्रवार, ३० मे, २०१४

बारावी नंतर काय ?

सायन्स बारावी उत्तीर्ण झाल्यावर कळतं की, आपली ही साइडच नाही. आपल्याला काही रसच नाही सायन्समध्ये. कॉर्मसला गेलेल्या विद्यार्थ्यांचंही असंच होतं. नंतर कळतं की, या आकडेमोडीत आपलं काही मन लागत नाही. पण बारावीनंतर करायचं काय हे कळत नाही. जी शाखा आवडत नाही त्याच शाखेची पदवी घ्यावी लागणं म्हणजे तर शिक्षाच आणि पुन्हा भविष्यात करिअर लटकण्याची शक्यता. तसं होऊ नये म्हणून बारावीनंतरच आपल्या आवडीचं करिअर आणि...