शुक्रवार, ३० मे, २०१४

बारावी नंतर काय ?


सायन्स बारावी उत्तीर्ण झाल्यावर कळतं की, आपली ही साइडच नाही. आपल्याला काही रसच नाही सायन्समध्ये. कॉर्मसला गेलेल्या विद्यार्थ्यांचंही असंच होतं. नंतर कळतं की, या आकडेमोडीत आपलं काही मन लागत नाही. पण बारावीनंतर करायचं काय हे कळत नाही. जी शाखा आवडत नाही त्याच शाखेची पदवी घ्यावी लागणं म्हणजे तर शिक्षाच आणि पुन्हा भविष्यात करिअर लटकण्याची शक्यता. तसं होऊ नये म्हणून बारावीनंतरच आपल्या आवडीचं करिअर आणि अभ्यासक्रम निवडण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी आपले बारावीतले मार्क हा तर आपला हुकमाचा एक्का ठरूच शकतो, कारण मार्क तुलनेने कमी असले तरी चालू शकते. कारण जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी त्यांच्या वाटेनं निघून जातात. आणि शिवाय त्या त्या अभ्यासक्रमाच्या एण्ट्रन्स एक्झामचा आधार असतोच. त्यात चांगले मार्क मिळवले तर बारावीत कमी मार्क मिळूनही ऐनवेळी आपल्या करिअरला योग्य ती दिशा देता येऊ शकते. तशी दिशा देणारे हे काही कोर्सेस.

द बॅचलर ऑफ मॅनेजमेण्ट स्टडीज म्हणजेच बीएमएस. मॅनेजमेण्ट या गोष्टीत आपल्याला रस आहे आणि बारावीनंतरची पदवीच या विषयात स्पेशलायझेशन करून घ्यायची, असं तुम्ही ठरवत असाल तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

१२+३ असं या अभ्यासक्रमाचं स्वरूप असल्यानं तुम्ही पदवीधर होतानाच एक स्पेशलायझेशन मिळवून नोकरीसाठी सज्ज होता.

महाराष्ट्रातल्या अनेक विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांत हा अभ्यासक्रम शिकवला जातो.

पात्रता काय.?

बारावीला किमान ५0 टे मार्क.

या अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा गुणवत्तेनुसार उत्तीर्ण.

स्कोप काय.?

थेट स्पेशलायझेशन. पदवीधर झाल्यावर तत्काल नोकरीची संधी. आणि मास्टर्स करण्याचीही थेट संधी. पदवीनंतर काय.? हा प्रश्न वयाच्या विशीत पडू नये इतपत तयारी.

-------**-------

सिनेमात काम करण्याचं, अमिताभ बच्चन होण्याचं स्वप्न तर सगळेच जण पाहतात; पण समजा अभिनय न करता सिनेमा बनवण्याचं, दिग्दर्शकच होण्याचं स्वप्न आपण पाहिलं तर.? ते बारावीनंतरच पाहाण्याची संधी तुम्हाला हा अभ्यासक्रम देतो. प्री प्रॉडक्शन, प्रॉडक्शन आणि पोस्ट प्रॉडक्शन हे सिनेमा बनवण्याचे तिन्ही टप्पे हा अभ्यासक्रम शिकवतो. त्यात साउण्ड रेकॉर्डिंग, एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी, स्क्रिप्ट रायटिंग, डायरेक्शन हे सगळे टप्पेही शिकवले जातात.

पुण्याच्या फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये हा अभ्यासक्रम शिकवला जातो. या विषयात रुची आणि अपार कष्ट करण्याची तयारी असेल तर बारावीनंतरच ही वाट निवडणं उत्तम.

पात्रता काय.?

बारावीत ५0 टे मार्क.

प्रवेश परीक्षेनुसार प्रवेश.

स्कोप काय.?

फिल्म मेकिंग या क्षेत्राचा स्कोप वेगळा काय सांगावा. मात्र, हा अभ्यासक्रम केल्यानं एडिटिंगपासून म्युझिक रेकॉर्डिंगपर्यंत विविध क्षेत्रांत काम करायची संधी मिळू शकते.

-------**-------

बॅचलर ऑफ मास मीडिया

कुठल्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास बीएमएम अर्थात बॅचलर ऑफ मास मीडिया हा कोर्स करता येतो. पत्रकारिता किंवा जाहिरात या विषयात स्पेशलायझेशनही याच कोर्समध्ये करता येते. हा अभ्यासक्रम फक्त मुंबई विद्यापीठातच शिकवला जात असला, तरी या समकक्ष अभ्यासक्रम महाराष्ट्रातले इतर विद्यापीठही शिकवतात. पुण्यातल्या सिम्बॉयोसिस संस्थेतही हा अभ्यासक्रम शिकवला जातो. पत्रकारिता किंवा जाहिरात या दोन्हीपैकी कुठल्याही एका क्षेत्रात करिअर करायचं, असं तुम्ही नक्की ठरवलेलं असेल, तर हा बारावीनंतर एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

पात्रता काय.?

बारावीत ५0 टे मार्क.

प्रवेश परीक्षेतून निवड होते. ही प्रवेश परीक्षा लेखी असते, त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंना ग्रुप डिस्कशन, मुलाखत या टप्प्यातून जाऊन गुणवत्तेनुसार प्रवेश मिळतो.

स्कोप काय.?

पत्रकारिता आणि जाहिरात यापैकी एका किंवा दोन्ही क्षेत्रांत तुम्ही आवडीप्रमाणे करिअर करू शकता. वर्तमानपत्र, चॅनल्स यासह जाहिरात एजन्सीत नोकरी करू शकता. मात्र त्यासाठी या अभ्यासाबरोबरच सदैव स्वत:ला अपडेट ठेवणं आणि आपली लेखन-वाचन कौशल्य वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. करिअर म्हणून गांभीर्यानं या क्षेत्राचा विचार करणार असाल तरच या खडतर वाटेनं गेलेलं मात्र बरं.!

-------**-------

बॅचलर ऑफ सोशल वर्क

समाजसेवा करायची आहे, सामाजिक संस्थेत काम करायचं आहे तर त्यासाठी पदवीनंतर मास्टर्स इन सोशल वर्क म्हणजे एमएसडब्ल्यूच करता येतं, असं काही नाही. बारावीनंतरच तुम्ही या विषयातली पदवीही घेऊ शकता. तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम तुम्हाला थेट करिअरच्या एका विशेष वाटेवर घेऊन जाऊ शकतो. त्यातही तुम्हाला जर देशातल्या नामांकित कॉलेजात प्रवेश मिळाला तर तुम्हाला सोशल वर्क या गोष्टीचा मोठा दृष्टिकोनही मिळू शकतो.

मुंबईतल्या टाटा समाज विज्ञान संस्थेत जर तुम्हाला प्रवेश मिळाला किंवा पुण्याच्या कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्कमध्ये जर शिकता आले, तर ती तुमच्या आयुष्यातली शिकण्याच्या आनंदाची महत्त्वाची तीन वर्षे ठरावी.

पात्रता काय.?

बारावी उत्तीर्ण.

मात्र या नामांकित संस्थांच्या राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणार्‍या प्रवेश परीक्षा या अत्यंत अवघड असतात. त्यात मिळालेल्या गुणांनुसार प्रवेश निश्‍चिती होते. मात्र महाराष्ट्रात अनेक विद्यापीठांतही हा अभ्यासक्रम शिकवला जातो. खासगी महाविद्यालयातून करताना मात्र फी किती आकारली जाते, याची खात्री करून घ्या.

स्कोप काय.?

सामाजिक संस्थांचं वाढतं जाळं आणि त्यात आवश्यक मनुष्यळ याचे प्रमाण पाहता या क्षेत्रात रोजगाराची संधी आहे. मात्र खरंच समाजकार्याची आवड असेल तर आणि तरच या क्षेत्रात या, केवळ पैसा कमावणे हा या क्षेत्रात काम करण्याचा उद्देश असू नये.
सौजन्य:- लोकमत
   

बुधवार, ९ एप्रिल, २०१४

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील करियर


माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील करियर
सर्वांसाठी करिअरची संधी असणारे आयटी (माहिती तंत्रज्ञान ) हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर या क्षेत्रात आपले करिअरचे स्वप्न पूर्ण करू शकतो. संगणक कुशलतेने वापर करण्याचे ज्ञान व कौशल्य आपल्याजवळ असेल आणि इंग्रजी भाषेचा वापर योग्य तर्‍हेने करता येत असेल तर आपला करिअरचा प्रश्न सुटलाच म्हणून समजा. या क्षेत्रातील विविध संधीचा हा थोडक्यात परिचय.



Call center व BPO मध्ये करिअर संबंधी संधी

या क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. Call center आणि BPO या क्षेत्रात $ ३०० बिलियनपेक्षा कितीतरी अधिक रकमेचा व्यवसाय उपलब्ध होत आहे. त्याचा आपण फायदा घ्यायला हवा. Call center व BPO म्हणजे काय? आजकाल अनेक विकसित देशांमध्ये आणि भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये सुद्धा मोठमोठ्या व्यवस्थापनासाठी / उद्योग व्यवसायासाठी ग्राहक सेवा केंद्राची फार मोठया प्रमाणात गरज आहे. ग्राहकांच्या तक्रारी नोंदवून घेणे, तक्रारी योग्य ठिकाणी पाठवणे, तांत्रिक माहिती देणे, टेली मार्केटिंग करणे, इ. कामांसाठी Call center मोठ्या व्यवस्थापनांना मदत करतात. Call center operator हे काम सहज करू शकतात. BPO म्हणजे Business process outsourcing. या ठिकाणी संगणकाद्वारे करता येण्याजोगी ठराविक स्वरुपाची नित्य कामे (हजेरीपत्रक - पे रोलची कामे, कर परतावा - TAX Return preparation, डेटाबेस अद्ययावत करणे, इत्यादी) केली जाऊ शकतात. या कामासाठी भरमसाठ पगार देऊन व्यावसायि क अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या पदवीधरांना नोकरी देण्याएवजी संगणकाचे ज्ञान असणारा कुठल्याही क्षेत्रातील पदविधराकडे हे outsourcing केले जाते. यात कंपन्यांना खूपच पैसा वाचतो व अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

आवश्यक पात्रता ( Qualification ) : कोणत्याही शाखेचा पदवीधर चालतो. इंग्रजीचे ज्ञान आणि संगणकाचा कुशलतेने वापर करता येणे आवश्यक आहेत. संभाषण कला असावी.

क्षमता ( Compitancy ) : संगणकामध्ये भरावयाची माहिती अचूक व जलद गतीने भरावयाची क्षमता असणार्‍यांना संधी जास्त आहे. बर्‍याच परदेशी (अमेरिका इत्यादी) व्यवस्थापनांची Call centers भारतात आहे. त्यासाठी परदेशी व्यक्तींचे उच्चार व बोलण्याची ढब समजणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे उत्तर देण्यासाठी आपल्यालाही तसे उच्चार करणे गरजेचे ठरते. अर्थात हे शिक्षण देणार्‍या अनेक संस्था उपलब्ध आहेतच.छोटया प्रशिक्षणाने या गोष्टी आत्मसात करता येणे शक्य आहे. फ्रेंच, जर्मन, इत्यादी परदेशी भाषा (Foreign Language) शिकून घेणार्‍या व्यक्तींना करिअरमध्ये लवकर प्रगती करता येते.

सुसंधी (Opportunities) : या क्षेत्रात प्रगतीला खूप वाव आहे. सुरुवातीला साधारणपणे पाच ते सहा हजार रुपये प्रतिमाह मिळू शकतो. कार्यक्षमता वाढवीत नेल्यास एकदोन वर्षात पंधरा हजार रुपये प्रती महिना प्राप्ती सहज होईल. आजकाल युवा व्यक्ती पदवी शिक्षण घेत असतांनाच संगणकाचे कौशल्य व ज्ञान सहज हस्तगत करू शकतात. त्यामुळे पदवीधर होताच करीअरची सुरुवात करता येउ शकते आणि व्यवसायात लवकर जम बसतो. संभाषण कला, वेळेचे नियोजन व तत्परता, सुस्पष्ट आवाज, नम्रता या बाबींमुळे लवकर प्रगती होते.

करियर इन टेक्निकल रायटिंग

आजकाल इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा उपयोग लहान मुलांपासून मोठया व्यक्तींपर्यंत सर्वच जण घरीदारी करीत असतात. या उपकरणांची माहिती वापरण्याच्या पद्धती, देखभाल, दुरुस्ती, तांत्रिक ज्ञान याबद्दलची माहिती सर्वांनाच आवश्यक असते. त्यामुळे या उपकरणाबरोबर संबंधित माहिती असलेली माहितीपत्रिका, पुस्तिका देणे निर्माणकर्त्याला आवश्यक असते. हि पुस्तिका लिहिणे म्हणजे थोडक्यात टेक्निकल रायटिंग. या माहितीपत्रिकेत छान छान रंगीत छायाचित्रे दिल्यास त्याची उपयुक्तता वाढते व उपकरणे हाताळणे सोपे जाते. अशी माहिती-पुस्तिका तयार करण्याचे काम एक चांगले करीअर क्षेत्र बनले आहे. software manual तयार करणे याच प्रकारात मोडते. पात्रता: कुठल्याही शाखेतील पदवीधारक, ज्यांना इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असेल आणि लेखनशैलीचे कौशल्य असेल, त्या व्यक्ती हे करिअर सक्षमतेने करू शकतात.

Animation , Multimedia क्षेत्रातील करिअर

सध्याचे युग हे जाहिरातीचे युग समजले जाते. जेवढी जाहिरात आकर्षक व लक्षवेधी तेवढा व्यापार जास्त हे गणितच बनले आहे. आकर्षक रंगसंगतीबरोबरच मोजक्या शब्दांत महत्त्वाची माहिती देणे हे वैशिष्ट्य ठरत आहे. त्याशिवाय चित्रपट, टीव्ही मालिका, वेबसाईटस इत्यादीमध्ये animation चे महत्त्व उपयोग दिवसेंदिवस अनेक पटीने वाढते आहे. त्यासाठी या क्षेत्रात करिअर करणार्‍यांना अमाप संधी आहे. पात्रता : ज्य़ा व्यक्तिना चित्रकलेत आवड आणि नैपुण्य प्राप्त आहे आणि त्याच्याजवळ web designing, 2d, 3d, चे ज्ञान आहे किंवा शिकण्याची इच्छा आहे त्या व्यक्ती हे करिअर करू शकतील. सृजनशीलता, कल्पकता हे गुण जोपासणार्‍यांसाठी हे करिअर आयुष्यासाठी मैलाचा दगड (mile stone) ठरू शकते. विशेष म्हणजे पदवी शिक्षण घेत असतांनाही याबाबतचे कौशल्य देणारे अभ्यासक्रम पूर्ण केले जाऊ शकतात.


संगणक हार्डवेअर, नेट्वर्किंगमध्ये करिअर
सध्याचे युग हे संगणक युग मानले जाते. त्यामुळे संगणकाची संख्या जशी अमर्याद वाढत आहे तेवढेच अमर्याद करिअर संगणक देखभाल, दुरुस्ती इत्यादींचे होत आहे. सॉफ्टवेअरपेक्षा जास्त मागणी हार्डवेअरमध्ये दिसू लागली आहे. प्रत्येक घरात प्रत्येक व्यवसायात संगणक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे संगणक दुरुस्ती, विक्री, देखभाल, नेट्वर्किंग इत्यादी क्षेत्रे अमर्याद विकसित झाली आहेत. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. बँका, रेल्वे, विमान कंपन्या, मनोरंजन क्षेत्रे, बीपीओ इत्यादी ठिकाणी करिअर घडू शकते.
पात्रता : कुठल्या शाखेत पदवीधर आवश्यक ते संगणक ज्ञान, प्रशिक्षण घेऊन या क्षेत्रात येऊ शकतो. पदवी शिक्षण घेत असतांना मोकळ्या वेळेत संगणक ज्ञान व कौशल्य आत्मसात करता येऊ शकते. क्षमता : आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र ( एम.सी.पी., एम.सी.एस.ए. इत्यादी ) प्राप्त करून घेणार्‍यांना विशेष संधी आहेत. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लागणारे कौशल्य देणाऱ्या प्रशिक्षण देणाऱ्या योजनाही उपलब्ध आहेत.


मास्टर ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन (MCA)

विविध शाखेतील पदवीधारकांसाठी संगणक क्षेत्रातील चांगले करियर करण्याची संधी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर मिळू शकते. कार्यक्षेत्र : आयटी कंपन्यांमध्ये प्रोग्रामर (योजक) म्हणून काम करता येईल. बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.सी.ए., इत्यादी पदवीधारक हा अभ्यासक्रम पूर्ण करून आयटी क्षेत्रात करियर करू शकतात. निवड निकष : तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत यासाठी साधारणतः मार्च मध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाते. साधारणपणे २ तासामध्ये १०० प्रश्न सोडवावे लागतात आणि २०० गुणांची परीक्षा होते. गणित, इंग्रजी, लॉजिकशी संबंधित हे प्रश्न असतात. अतिशय सावधानपूर्वक आणि खात्री असल्यासच प्रश्नोत्तर देणे योग्य ठरते कारण उत्तर चुकल्यास गुण उणे होतात हे लक्षात ठेवावे. इंतेरांचे test मध्ये मिळालेले गुण आणि पाहिजे असलेल्या संस्थांसाठी भरलेला ऑप्शन फॉर्म, यांच्यावर आधारित विध्यार्थ्यांना एम.सी.ए. च्या शिक्षण देणाऱ्या संस्थेत प्रवेश मिळतो. या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमात गणित विषयाबरोबर संगणकासंबंधी सोफ्टवेअर, हार्डवेअर, प्रोग्रामिंग लांग्वेजेस इत्यादीबद्दल शिक्षण दिले जाते. शेवटच्या वर्षी एखाद्या कंपनीत प्रोजेक्टचे कामही करावे लागते. केम्पस इंटरव्यू विविध परीक्षांतील सातत्यपूर्ण गुणवत्ता टिकविणाऱ्या विद्यार्थांची निवड प्राधान्याने होते. यावेळी गटचर्चा मुलाखत याद्वारे निवड निश्चित केली जाते. क्षमता वृद्धी : शिकत असतांनाच काही परदेशी भाषा शिकणे, लवकर नोकरी मिळविण्यासाठी फायदेशीर ठरते.


मास्टर ऑफ कॉम्प्युटर मेनेजमेंट

संगणकाच्या मदतीने व्यवस्थापन क्षेत्रातील कामे सुकर होतात. कार्यक्षेत्र : माहिती तंत्रज्ञान शाखेत करियर करता येते. पात्रता : आर्ट्स, कॉमर्स, इत्यादी शाखेमधील पदवी. हा पदव्युत्तर कोर्स करतांना व्यवस्थापन आणि संगणक क्षेत्रातील तांत्रिक विषयांचा अभ्यास करावा लागतो.शिवाय सोफ्टवेअर मार्केटिंग इत्यादी विषयही शिकावे लागतात. संशोधन (रिसर्च) करणाऱ्यांसाठी करीयरच्या संधी अनेकांना संशोधन कार्य करण्याची आवड असते पण त्याचा कालावधी, रोजगाराची संधी, विविध कार्यप्रणाली भविष्यकालीन उत्कर्ष इत्यादीबद्दल अज्ञात असते.

पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पी.एच.डी. मिळवून पुढे संशोधन क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या व्यक्ती यासाठी पत्र समजल्या जातात. पी.एच.डी. मिळविल्यावर साधारणपणे तीन ते चार वर्ष संशोधन कार्य करावे लागते.
क्षमता : स्वतःचे स्वतः ( स्वअध्ययन ) करण्याची सवय, अवलोकन कौशल्य, चिकाटी, दिर्घोद्योगाची आवड, पृथ:करण, इत्यादी गुण असणार्या व्यक्ति या क्षेत्रात लवकर पारंगत होतात.

मंगळवार, ८ एप्रिल, २०१४

फोटोग्राफी एक उज्ज्वल करियर

फोटोग्राफी एक उज्ज्वल करियर

http://mcgadmins.blogspot.in/




फोटोग्राफी ही एक कला आहे. छायाचित्रकाला एक चांगली दृष्टी असावी लागते, असे म्हटले जाते. तसेच त्याने या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञानही अवगत करणे आवश्यक असते. मात्र फोटोग्राफी हे एकमेव माध्यम आहे की त्यात भाषेची आवश्यकता नसते. या क्षेत्रात शब्दापेक्षा प्रतिमेचा अधिक प्रभाव पडत असतो. एक छायाचित्रे दहा हजार शब्दांची गरज भागवते. फोटोग्राफी ही अशी कला आहे की त्यात आपल्याला उज्ज्वल करियर करण्‍याची संधी आहे.

एक यशस्वी छायाचित्रकार बनण्यासाठी आपल्याकडे वास्तविक सौंदर्य पाहण्याची दृष्टी व तांत्रिक ज्ञान आवश्यक आहे. आपले नाजूक डोळे कुठल्याही वस्तुचे छायचित्र व्हिज्यूलाईज करू शकतात. वरील सगळे गुण आपल्यात असून फोटोग्राफीमध्ये करियर करायची इच्छा आहे तर या क्षेत्रातील सगळी कवाडं आपल्यासाठी खूली आहेत...

आवश्यक पात्रता-
फोटोग्राफी हे एक क्रिएटीव्ह माध्यम असल्याने त्यासाठी विशेष पात्रतेची आवश्यकता नसते. आपली दृष्टी एखाद्या कविसारखी पाहिजे. 'जे ना देखे रवी... ते पाहे कवी !' असे म्हटले जाते. कवीकडे ज्याप्रमाणे नवीन पाहण्याची दृष्टी असते, त्याप्रमाणे छायाचित्रकाराची दृष्टी असायला पाहिजे.
फोटोग्राफीच्या प्रशिक्षणासाठी आपली शैक्षणिक पात्रता १०+२ असली पाहिजे. तसे पाहिले तर शाळेत विद्यार्थ्याना एक्स्ट्रा एक्टिव्हीटी म्हणून फोटोग्राफी शिकवली जाते. देशात फोटोग्राफीचा अभ्यासक्रम शिकवणार्‍या अनेक संस्था असून त्यात फोटोग्राफीतील पदवी, डिप्लोमा किंवा सर्टीफिकेट कोर्स उपलब्ध आहेत. फोटोग्राफीच्या अंगी कल्पनाशक्ती हा महत्त्वाचा गुण असतो. पुस्तकी ज्ञानापेक्षा त्याचा प्रात्याक्षिकाचे ज्ञानावर अधिक भर असतो.

जाहिरात, पत्रकारीता व फॅशनसोबत मॉडेलींग क्षेत्रात फोटॉग्राफीचे क्षेत्र कमा‍लीचे विस्तारले आहे. त्यामुळे या क्षेत्रात होतकरू तरूणासाठी मोठ्या प्रमाणात करियरच्या संधी उपलब्ध आहेत.

प्रेस फोटोग्राफर-
प्रेस फोटोग्राफरला 'फोटो जर्नलिस्ट' या नावाने ओळखले जाते. प्रेस फोटॉग्राफर स्थानिक व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्र, मासिके तसेच वृत्तसंस्थेसाठी काम करत असतात. पत्रकाराप्रमाणे प्रेस फोटोग्राफरची ही प्रचंड धावपळ असते. कमी वेळात अधिक क्षण टिपण्यातच फोटोग्राफरचे कौशल्य असते.

फीचर फोटोग्राफर-
एखादी कथा विविध छायाचित्राच्या माध्यमातून प्रदर्शित करण्‍याची कला फीचर फोटोग्राफरच्या अंगी असते. फोटोग्राफरला संबंधित विषयाचे सखोल ज्ञान आवश्यक असते. छायाचि‍त्राच्या माध्यामतून विविध कथा, प्रसंग प्रेक्षकासमोर अथवा वाचकासमोर प्रसिद्ध केले जात असते. फीचर फोटोग्राफी क्षेत्रात विषय हे नेहमी बदलत असतात. वन्यजीवन, क्रीडा, यात्रा वृत्तांत, पर्यावरण यादी विषय असू शकतात.

कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल फोटॉग्राफर-
कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल फोटॉग्राफरचे कार्य एका ठराविक कंपनी किंवा कारखान्यासाठी चालत असते. गृहपत्रिका, जाहिराती, यंत्राचे छायाचित्रे काढणे आदी कामे त्यांना करावी लागतात. आपल्या उत्पादनाविषयी आकर्षक छायाचित्राच्या माध्यामातून जनतेला माहिती करून देणे, हे कमर्शियल फोटॉग्राफरचे मुख्य कार्य असते.

जाहिरात फोटॉग्राफर-
जाहिरात एजन्सी, मॉडेलिंग स्टुडिओमध्ये जाहिरात फोटोग्राफर नेमले जातात. बाजारात येणार्‍या नवीन उत्पादनाच्या लोकप्रियेतेमागे खरे कौशल्य जाहिरात फोटोग्राफरचे असते. त्यांचे कार्य सगळ्यात आव्हानात्मक असते.

फॅशन फोटॉग्राफर-




फोटोग्राफी क्षेत्रात फॅशन फोटॉग्राफीची मोठी क्रेझ आहे. फॅशन क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. स्मार्ट वर्क आणि चांगली मिळकत तसेच स्वत:चे नाव होण्यासाठी तरूण-तरूणी मोठ्या संख्येने 'फॅशन फोटोग्राफी' हे क्षे‍त्र करियर म्हणून निवडतात. मॉडेलिंगच्या क्षेत्रातील जाहिरात एजन्सी व फॅशन स्टुडिओमध्ये कुशल फोटॉग्राफरची नेहमी आवश्यकता भासत असते. फॅशन फोटॉग्राफरला मुंबई व दिल्ली सारख्या मोठ्या शहरातच जास्त कामे मिळत असतात. तसेच फॅशन हाउस, डिझायनर, फॅशन जर्नल्स, वर्तमानपत्रे, खाजगी वाहिनी येथेही फॅशन फोटॉग्राफरला संधी मिळत असते.

याचप्रमाणे पोर्टेट किंवा वेडींग फोटॉग्राफी, नेचर व वाईल्डलाईफ फोटॉग्राफी, फॉरेंन्सिक फोटॉग्राफी, डिजिटल फोटॉग्राफी, फाईन आर्ट्स फोटॉग्राफी, ट्यूरिष्ट फोटोग्राफी या विविध प्रकारातही आपल्याला करियर करता येते -सौजन्य वेबदुनिया

सोमवार, ३ मार्च, २०१४

बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिकाच्या 942 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात लिपिक (942 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामना, लोकसत्ताच्या 3 मार्च 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती या  लिंक वर उपलब्ध आहे 
किवा हि वेबसाईट पहावी  http://portal.mcgm.gov.in  पाहण्या साठी लिंक वर क्लिक करा  
>> महानगरपालिका<<  

रविवार, २ मार्च, २०१४

अपंगांसाठी जॉब पोर्टल

 http://www.firstpost.com/wp-content/uploads/2013/12/Jobsite.jpg
अपंगाना रोजगाराची समान संधी मिळवून देणारे  ciispecialabilityjobs.in  हे जॉब पोर्टल ' सीआयआय ' आणि ' मॉन्स्टर डॉट कॉम ' यांनी एकत्रितपणे सुरू केले असून सीएसआर अॅक्टिव्हिटीचा भाग म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे. कुठल्या उद्योगात काम करायचे आहे, कुठे करायचे आहे, अगदी देशाबाहेरही, कुठल्या विभागात काम करायचे याबाबतची वर्गवारी या बेवसाइटवर असून त्यानुसार अपंगांना रोजगार शोधता येईल. रोजगार शोधणाऱ्यांनी आणि त्यांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांनी रजिस्टर करणे गरजेचे असून त्याद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. 
हि माहिती महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रकाशित झाली आहे 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 56 जागांसाठी भरती


महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत उच्च व तंत्रशिक्षण विभागातील सहायक प्राध्यापक – मानसशास्त्र (14 जागा), सहायक प्राध्यापक – प्राणीशास्त्र (8 जागा), सहायक प्राध्यापक – राज्यशास्त्र (1 जागा), सहायक प्राध्यापक – भूगोल (2 जागा), सहायक प्राध्यापक – इतिहास (4 जागा), सहायक प्राध्यापक –गृहशास्त्र (4 जागा), सहायक प्राध्यापक –तत्वज्ञान (4 जागा), सहायक प्राध्यापक – कायदा (9 जागा), सहायक प्राध्यापक – सांख्यिकीशास्त्र (1 जागा), सहायक प्राध्यापक – इलेक्ट्रॉनिक्स (१ जागा), सहायक प्राध्यापक – जीवरसायनशास्त्र (4 जागा) तसेच महिला व बाल विकास विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी/जिल्हा महिला व बालविकास अधिकारी/सहायक आयुक्त, परिविक्षा अधिक्षक (3 जागा) आणि सामान्य प्रशासन विभागातील सचालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2014 आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  

Pocket android app download here 

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापकाच्या 61 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालये आणि उपनगरीय रुग्णालयातील विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक (61 जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ताच्या दि. 26 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.