बृहन्मुंबई
महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालये आणि उपनगरीय रुग्णालयातील विविध
विषयातील सहाय्यक प्राध्यापक (61 जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज
करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै.
लोकसत्ताच्या दि. 26 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४
शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३
दहावीची लेखी परीक्षा 3 मार्च 2014, तर बारावीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी 2014 पासून सुरू
बारावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून, दहावीची ३ मार्चपासून
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक सोमवारी जाहीर केले. बारावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा तीन मार्चपासून सुरू होणार आहे. बारावीच्या विज्ञान विषयांच्या पेपरमध्ये किमान तीन दिवसांचा असलेला खंड हे या वेळापत्रकाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
गेल्या वर्षीच्या वेळापत्रकात विज्ञान विषयांच्या पेपरदरम्यान पुरेशी ' गॅप ' नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. त्यामुळे बोर्डाला परीक्षेच्या आधी काही दिवस, जाहीर केलेले वेळापत्रक बदलावे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर, यंदा विज्ञान विषयांमध्ये कमीत कमी तीन दिवसांचा खंड ठेवण्यात आला आहे.
बोर्डाने या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, बारावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत होणार आहे. त्यामध्ये विज्ञान शाखेचा फिजिक्सचा पेपर २५ फेब्रुवारीला, गणिताचा पेपर १ मार्चला, केमिस्ट्रीचा पेपर ६ मार्चला आणि बायोलॉजीचा पेपर १० मार्चला होणार आहे. कॉमर्स शाखेच्या मुख्य विषयांच्या परीक्षेचा कालावधी २० फेब्रुवारी ते १० मार्च असा असून, आर्ट्स शाखेच्या मुख्य विषयांची परीक्षा २० फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान होईल.
यंदा एमसीव्हीसी सर्वसाधारण पायाभूत अभ्यासक्रम व तंत्र गटातील विषयांचा अभ्यासक्रम पुनर्रचित केलेला नसल्याने नियमित विद्यार्थ्यांना या विषयांची परीक्षा मार्च २०१३ च्या परीक्षेतील अभ्यासक्रमानुसार द्यावी लागेल.
दहावीची परीक्षा ३ मार्च ते २७ मार्च या कालावधीत होणार आहे. दहावीला मुख्य विषयांच्या पेपरदरम्यान किमान एक दिवसाची ' गॅप ' ठेवण्यात आली आहे.

हि माहिती महाराष्ट्र टाइम्स या वृत पत्रात प्रसिद्ध झाली आहे
बना आरटीओ निरीक्षक
आरटीओमध्ये ( महाराष्ट्र मोटार वाहन विभाग ) सहायक मोटार वाहन निरीक्षक हे पद असते . वाहनांची नोंदणी , तपासणी , विविध प्रकारचे वाहन परवाने ( लायसन्स ) देणे यासारखी तांत्रिक कामे यांना करावी लागतात .
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी एकूण २१५ जागा भरल्या जाणार आहेत . पूर्व व मुख्य परीक्षेऐवजी मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार एकच परीक्षा १५ डिसेंबर २०१३ ला होईल .
वयोमर्यादा - किमान १९ वर्षे , कमाल ३३ वर्षे
शैक्षणिक पात्रता - दहावीनंतरील ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा ३ वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अनुभव - मोठ्या गॅरेज वा कार्यशाळेमध्ये जड माल वाहतुक किंवा प्रवासी वाहन दुरुस्तीचे व परिरक्षेचे पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून एक वर्ष काम केल्याचा अनुभव हवा .
अतिरिक्त आवश्यक अर्हता - मोटार सायकल , हलके मोटार वाहन , जड माल वाहतूक वाहन आणि जड प्रवासी वाहतूक वाहन चालवण्याचं कायमस्वरूपी लायसन्स उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे .
उमेदवाराला मराठी लिहीता , वाचता व बोलता आले पाहिजे .
शारीरिक पात्रता -
पुरुष - उंची १६३ से . मी ., छाती - ८४ ( छातीचे किमान प्रसरण - ५ सें . मी .)
महिला - उंची १५५ सें . मी ., वजन - किमान ४५ कि . ग्रॅ .
प्रवेश अर्ज - परीक्षेसाठी प्रवेश अर्ज केवळ ऑनलाईन स्वीकारण्यात येतील . ऑनलाईन प्रवेश अर्ज www.mahaonline.gov.in या वेबसाईटवरून भरावेत .
प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत १ नोव्हेंबर २०१३ आहे . सविस्तर जाहिरात , परीक्षेच्या अभ्यासक्रमांसाठी तसेच जुन्या प्रश्नपत्रिकांसाठी www.mpsc.gov.in ही वेबसाईट पहावी .
मुख्य परीक्षा अभ्यासक्रम - मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ ( बहुपर्यायी ) स्वरूपाची असून एकच प्रश्नपत्रिका असेल . प्रश्नपत्रिकेमध्ये मेकॅनिकल व ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग विषयावर प्रश्न विचारले जातील . प्रश्नांचा दर्जा पदविकास्तरावरील असेल .
१५० प्रश्नांसाठी ३०० गुण असतील . परीक्षेचा कालावधी दीड तास असून माध्यम इंग्रजी असेल .
- आनंद मापुस्कर
nokari

बुधवार, २६ जून, २०१३
कमी शिक्षणातही सरकारी नोकरी
सरकारी नोकरी म्हणजे ग्रॅज्युएशन हवंच असा अनेकांचा समज असतो पण दहावी आणि बारावीनंतरही अनेक सरकारी खात्यांमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी असतात. सुरुवातीला अगदी छोट्या पदाची संधी असली तरी विभागीय परीक्षा देऊन प्रमोशन घेता येतं. याच स्पर्धा परीक्षा आणि विविध संधींची माहिती
स्टाफ सिलेक्शन कमिशन
कम्बाइन्ड हायर सेकंडरी लेव्हल एक्झामिनेशन -
( डेटा एण्ट्री ऑपरेटर व लोअर डिव्हिजन क्लार्क भरती)
स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत केंद्र सरकारच्या विविध ऑफीसमध्ये डेटा एण्ट्री ऑपरेटर व लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी भरती केली जाते . या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना काही वर्षांनी विभागीय परीक्षा देऊन प्रमोशन घेता येतं. या भरती परीक्षेतून उमेदवार २ गटात (एक्स व वाय)मध्ये नोकरीसाठी पसंती देऊ शकतात .
ग्रुप एक्स :
यात निवडलेले उमेदवार खालील ऑफिसमध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क म्हणून काम करू शकतात .
आर्म्ड फोर्सेस हेडक्वार्टर्स
निवडणूक आयोग
इंटेलिजन्स ब्युरो
कोस्ट गार्ड
इंडियन फॉरेन सर्व्हिस
सीबीआय
राष्ट्रपती सचिवालय
संसदीय कामकाज मंत्रालय
केंद्रीय दक्षता आयोग
ग्रुप वाय :
यातले उमेदवार खालील ऑफिसमध्ये डेटा एण्ट्री ऑपरेटर म्हणून काम करू शकतात.
कॅग
लेखा परीक्षक
संरक्षण दले लेखा विभाग
शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी उत्तीर्ण
वयोमर्यादा - १८ ते २७ वर्षे.
परीक्षा फी : १०० रुपये ( महिला तसेच एससी , एसटी व अपंग उमेदवारांना फी नाही )
विद्यार्थी प्रवेश अर्ज संबंधित विभागीय ऑफिसमध्ये अर्ज पाठवू शकतात किंवा ऑनलाइन भरू शकतात विद्यार्थ्यांनी केवळ एकच अर्ज भरावा. त्यापेक्षा जास्त अर्ज भरल्यास परीक्षेला बसता येणार नाही. महाराष्ट्राचं विभागीय केंद्र मुंबईला असून परीक्षा केंद्र औरंगाबाद , मुंबई , कोल्हापूर , नागपूर , पुणे , नाशिक , अमरावतीला आहेत.
स्टाफ सिलेक्शन कमिशन (पश्चिम विभाग)
हेल्प लाईन नं -
निवड प्रक्रिया -
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा , स्कील टेस्ट (डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी) , टायपिंग टेस्ट (लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी) द्वारे केली जाते
लेखी परीक्षा -
लेखी परीक्षा २०० गुणांची असून पेपरचं स्वरुप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असते. २ तासांचा वेळ असतो. पेपर इंग्रजी व हिंदी माध्यमातून उपलब्ध असतील. कार्मिक व प्रशिक्षण विभागाची मान्यता मिळाल्यास तसेच प्रिंटींग व तज्ञांची उपलब्धता झाल्यास या परीक्षेचे पेपर्स मराठी वा इतर भाषेतून तयार केले जातील असं कमिशनच्या जाहिरातीमध्ये नमूद केले आहे. लेखी परीक्षेत चार विषयावर प्रत्येकी ५० गुणांचे प्रश्न विचारले जातात. चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातात.
विषय
सामान्य बुध्दीमापन
इंग्रजी भाषा
क्वांटीटिटीव्ह अॅप्टिटयुड ( अंकगणितीय क्षमता)
सामान्य ज्ञान
स्कील टेस्ट-
डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना स्कील टेस्टसाठी बोलावलं जाते. स्कील टेस्टमध्ये १५ मिनिटं इंग्रजी भाषेत टायपिंग करायला सांगितलं जातं. टायपिंगचा वेग तासाला ८००० की डिप्रेशन असायला हवा. त्यात केवळ पास होणं आवश्यक आहे. त्याला वेगळे गुण नसतात.
टायपिंग टेस्ट -
लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना टायपिंगच्या परीक्षेसाठी बोलावले जाते. ही टेस्ट हिंदी किंवा इंग्लीशची असते. इंग्लीश टायपिंगचा वेग ३५ शब्द प्रती मिनिट तर हिंदीचा वेग ३० शब्द प्रती मिनिट असावा लागतो. टायपिंगची परीक्षा कम्प्युटरवर घेतली जाते त्यात १० मिनीटात दिलेला उतारा टाइप करायचा असतो.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
क्लार्क-टायपिस्ट ( इंग्रजी - मराठी)
मंत्रालयीन विभाग व मुंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील क्लार्क आणि मराठी व इंग्रजी टायपिस्ट या गट क संवर्गातील भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परीक्षा घेण्यात येते.
वयोमर्यादा -
किमान १८ वर्षे व कमाल ३३ वर्षे.
शैक्षणिक पात्रता -
दहावी पास
क्लार्क-टायपिस्ट (मराठी) साठी मराठी टायपिंग वेग ३० शब्द प्रति मिनिट
तर क्लार्क-टायपिस्ट (इंग्रजी)साठी इंग्रजी टायपिंग वेग ४० शब्द प्रति मिनिट हवा.
उमेदवाराला मराठी बोलता , वाचता व लिहीता येणं गरजेच आहे.
परीक्षा टप्पे -फक्त लेखी परीक्षा घेतली जाईल.
लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असून ४०० गुणांसाठी २०० प्रश्न असतील. वेळ दोन तास असेल. इंग्रजी विषयाकरिता इंग्रजी माध्यम तर अन्य सर्व विषयांसाठी मराठी माध्यम असेल.
अभ्यासक्रम
मराठी - व्याकरण , सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.
इंग्रजी - स्पेलिंग , व्याकरण , सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.
सामान्यज्ञान - दैनंदिन घटना , नेहमीचे अनुभव , धर्म , साहित्य , राजकारण , शास्त्र , सामाजिक व औद्योगिक सुधारणा , क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्ये , सर्वसाधारणपणे , भारताच्या विशेष करुन महाराष्ट्राच्या इतिहासाची व भूगोलाची रुपरेषा यावरील प्रश्न.
बुध्दिमापन विषयक प्रश्न - उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करु शकतो , हे आजमावण्यासाठी प्रश्न.
अंकगणित - बेरीज , वजाबाकी , गुणाकार , भागाकार , दशांश अपूर्णांक , सरासरी व टक्केवारी.
क्लार्क व टायपिस्ट पदांसाठीची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून केली जाते. यासाठी महाराष्ट्रातील शासकीय परीक्षा मंडळाची टायपिंग परीक्षा पास असणं आवश्यक असतं. नुसतंच टायपिंग येऊन उपयोग नाही
सोमवार, १ एप्रिल, २०१३
फंडे सीईटीचे!
यंदापासून वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट (NEET) प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. 'नीट' परीक्षेत संपादन केलेल्या गुणांच्या आधारे वैद्यक अभ्यासक्रमातील प्रवेश निश्चित केले जातील..
यंदाच्या वर्षांपासून देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशपद्धतीत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. तो म्हणजे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी निकष ठरणारी देशपातळीवर एकच प्रवेशपरीक्षा - नीट (NEET) घेण्यात येणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, राष्ट्रीय वैद्यक परिषद आणि सीबीएसई यांनी एकत्रितपणे हा निकष निश्चित केला आहे. दिल्लीच्या एआयआयएमएस आणि चंदिगढच्या जेआयपीएमईआर या महाविद्यालयांव्यतिरिक्त देशभरातील सर्व ठिकाणच्या वैद्यक महाविद्यालयांचे प्रवेश 'नीट' परीक्षेतील गुणांच्या आधारे दिले जातील. त्यानुसार, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशही 'नीट'च्या आधारे होतील. या नव्या बदलानुसार, गेल्या वर्षांपर्यंत घेतली जाणारी एमएचटी सीईटी तसेच एआयपीएमटी, एएफएमसी या इतर परीक्षा रद्दबातल ठरल्या असून त्यांची जागा 'नीट' या प्रवेशपरीक्षेने घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून वैद्यक प्रवेशपरीक्षेसाठीचा हा मोठा बदल आहे.
वैद्यक प्रवेशाचा निकष ठरलेल्या या 'नीट' परीक्षेचा अभ्यासक्रम हा 'सीबीएसई'च्या अकरावी आणि बारावीच्या पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांच्या अभ्यासक्रमावर बेतलेला आहे. 'नीट' परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असेल; ज्यात उत्तराचे चार पर्याय दिलेले असतील आणि त्यातील एका अचूक उत्तराची निवड विद्यार्थ्यांने करणे अपेक्षित आहे. या परीक्षेच्या गुणपद्धतीत निगेटिव्ह मार्किंग असल्याकारणाने चुकलेल्या उत्तरांसाठी गुण गमावण्याचा फटका विद्यार्थ्यांना बसेल. त्यामुळे नेमके उत्तर माहीत असलेले प्रश्नच विद्यार्थ्यांनी सोडवावेत.
'नीट' परीक्षेची काठिण्यपातळी ही 'एआयपीएमटी'सारखी असणार आहे, जी 'एमएच-सीईटी'- या राज्यपातळीवर आतापर्यंत घेतल्या गेलेल्या प्रवेशपरीक्षेच्या तुलनेत जास्त कठीण मानली जाते. त्यामुळे अर्थातच १९९९ पासून २०१२ पर्यंत राज्यात जी 'एमएच-सीईटी' ही राज्यभरातील वैद्यक पदवी प्रवेशासाठीची सीईटी घेतली गेली त्या तुलनेत 'नीट' या प्रवेशपरीक्षेची काठिण्यपातळी अधिक असणार, यात शंका नाही. आणि म्हणूनच या नव्या परीक्षेला सामोरे जाताना अभ्यासाच्या पद्धतींमध्येही विद्यार्थ्यांनी योग्य बदल करायला हवा.
'नीट' परीक्षेची परीक्षापद्धती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण १८० प्रश्न विचारले जातील. त्यातील प्रत्येकी ४५ प्रश्न हे पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र (physics, chemistry, botany and zoology) या विषयांवर विचारले जातील. अचूक उत्तराला चार गुण दिले जातील आणि उत्तर चूक असेल तर त्यासाठी प्रत्येकी एक गुण वजा करण्यात येईल. हे लक्षात घेता विद्यार्थी 'नीट' परीक्षेत - १८० ते + ७२० इतके गुण संपादन करू शकतो. उलटपक्षी, आतापर्यंत घेतल्या गेलेल्या 'एमएच-सीईटी' परीक्षेत विद्यार्थ्यांला राज्यातील १८ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी २०० पैकी १७० हून अधिक गुण मिळवणे आवश्यक ठरत होते. यंदाच्या वर्षी 'नीट' परीक्षेत एकूण ७२० गुणांपैकी ३०० गुण व त्याहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांला राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवणे शक्य होईल, असा अंदाज व्यक्त केला जातो.

'नीट' परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना पुढील टिप्स नक्कीच उपयोगी ठरतील -
१. 'नीट'मधील फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांला मॅथ्समधील वेक्टर्स, डिफरन्शियल अॅण्ड इन्टग्रल कॅलक्युलस, क्वान्ड्राटिक इक्वेशन्स, प्रोग्रेशन्स अॅण्ड स्ट्रेट लाइन या पाठांचा अभ्यास उत्तमरीत्या असणे आवश्यक आहे. म्हणजेच 'नीट' देणाऱ्या परीक्षार्थीने गणित विषयाचा सविस्तर अभ्यास करायला हवा. 'नीट' देणारे विद्यार्थी बरेचदा गणिताचा अभ्यास न करण्याची घोडचूक करतात. ती चूक विद्यार्थ्यांनी टाळायला हवी.
२. फिजिक्स, फिजिकल केमिस्ट्री आणि ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयांचा अभ्यास करताना पाठांतराऐवजी ते समजून घेण्यावर भर द्यावा. केवळ स्मरणशक्ती अथवा फॉम्र्युला सबस्टिटय़ूशन पद्धतीऐवजी संकल्पना समजून घेऊन उपयोजन (अॅप्लिकेशन) कौशल्य वापरावे. अशा पद्धतीने अभ्यास केल्यास या विषयामधील प्रश्न सोडवणे परीक्षार्थीला सुलभ जाईल.
३. अनेक विद्यार्थी ऑरगॅनिक केमिस्ट्री आणि इनऑरगॅनिक केमिस्ट्रीमधील रिअॅक्शन्स या नुसत्या पाठ करतात. मात्र 'नीट' परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांने सुरुवातीला रिअॅक्शन मेकॅनिझम इन ऑरगॅनिक केमिस्ट्रीची तत्त्वे आणि इनऑरगॅनिक केमिस्ट्रीमधील बॉण्डिंग, रिडॉक्स आणि पिरिऑडिक टेबल ही तत्त्वे पूर्णत: समजून घ्यावीत आणि त्यात पारंगत व्हावे. त्यामुळे केमिस्ट्रीचा अभ्यास करताना पाठांतराची गरज विद्यार्थ्यांना भासणार नाही.
४. 'नीट'च्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी अरिहंत, दिशा, टाटा मॅक्ग्रॉ हिल्स, एमटीजी, सेन्गेज, पीअरसन्स आदी राष्ट्रीय पातळीवरील प्रकाशकांच्या पुस्तकांचा उपयोग करावा. राष्ट्रीय परीक्षांसाठी शिकवणीसाठी अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे. जे शिक्षक राज्य पातळीवर परीक्षांपुरतेच शिकवतात, त्यांना 'नीट' परीक्षेच्या अभ्यासक्रमातील अनेक धडे शिकवता येणे शक्य असेलच, असे नाही.
५. बायोलॉजी हा माहिती देणारा विषय असून त्याच्या योग्य नोट्स काढणे आणि या विषयाचा वारंवार अभ्यास करणे आवश्यक ठरते, ज्यामुळे हा विषय चांगलाच लक्षात राहतो. त्याच वेळेस बायोलॉजी या विषयातील अनेक संकल्पनांचे पाठांतर करण्याऐवजी त्या सविस्तरपणे समजून घेणे आवश्यक ठरते. ह्य़ुमन जेनेटिक्स, जेनेटिक इंजिनीअरिंग, बायोइन्फॉर्मेटिक्स, बायोमेडिकल इन्स्ट्रमेन्टेशन, अॅनाटोमी ऑफ कॉर्डेट्स अॅण्ड नॉन कॉर्डेट्स, बायोटेक्नोलॉजी आणि मॉलीक्युलर बायोलॉजी या विषयांकडे सर्वसाधारणपणे
सर्वाधिक विद्यार्थी दुर्लक्ष करणे पसंत करतात. मात्र हे विषय महत्त्वाचे आहेत आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या विषयांचा सविस्तर अभ्यास करावा.
६. 'नीट' परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांला बायोलॉजी या विषयाच्या अनेक संकल्पना उत्तमरीत्या माहीत असणे अत्यावश्यक आहे. फिजिक्समधल्या थर्मोडायनॅमिक्स आणि इलेक्ट्रोमॅग्नॅटिक्स तसेच केमिस्ट्रीतील आयोनिक इक्विलिब्रिया, ऑरगॅनिक केमिस्ट्री आणि बायोमॉलिक्यूल्स या धडय़ांचा बायोलॉजीच्या अनेक संकल्पना समजून घेण्यास उपयोग होतो.
७. 'नीट' परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांच्या अभ्यासासाठी 'एनसीईआरटी'च्या पाठय़पुस्तकांचा सविस्तर अभ्यास करायला हवा.
८. 'नीट' परीक्षेचा पॅटर्न लक्षात घेत परीक्षेपूर्वी
तीन महिने अनेक चाचणीपरीक्षा दिल्या तर विद्यार्थ्यांना परीक्षेचा चांगलाच सराव होईल आणि 'नीट'मध्ये विचारल्या गेलेल्या अमुक एका प्रश्नाचे उत्तर आपण लिहू शकतो का, याचाही अंदाज विद्यार्थ्यांना येऊ शकेल. ही निर्णयक्षमता विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी चाचणी परीक्षांमधील आपल्या कामगिरीचे सातत्याने विश्लेषण करणे आवश्यक ठरते.
वर नमूद केलेल्या बाबी लक्षात घेतल्या तर वैद्यकीय अभ्यासक्रमांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना 'नीट' परीक्षा देणे आणि त्यातील आपल्या कामगिरीचा आलेख उंचावणे सहजशक्य ठरेल.
संचालक, आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्र -दुर्गेश मंगेशकर

मंगळवार, १२ मार्च, २०१३
व्यावसायिक कौशल्य आणि युक्त्या
यशस्वी व्यावसायिक व्हायचं असेल , तर त्यासाठी व्यावसायिक कौशल्यांबरोबर आत्मविश्वास , जोखीम पेलण्याची तयारी आणि वाटाघाटीचं कौशल्यही हवंच. त्याविषयी थोडंसं...
व्यवसाय सुरु करून तो यशस्वी करण्यासाठी उद्योजकाकडे बाजारपेठेच्या माहितीबरोबरच आणखी काही कौशल्यं असणं जरुरीचं असते. ही कौशल्य अनुभवातूनच जास्त आत्मलसात करता येतात.
इंटरपर्सनल स्किल्स
व्यवसाय म्हटला की लोकांशी संबंध आलाच. त्यामुळे तुम्हाला लोकांशी संवाद साधायला आवडतो की नाही हे तपासा. तुम्ही लोकांशी कशाप्रकारे वागता यावर तुचमं यश अवलंबून असते. स्पर्धेच्या युगात कस्टमर सर्व्हिस हा तुमचा वेगळेपणा ठरू शकतो. पण पेशन्स हवाच. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे , ऐकून घेण्याची कला असायला हवी. संभाषण म्हणजे फक्त स्वतःचं बोलणं दुसऱ्याला ऐकवणं नव्हे. तर दुसऱ्याचं बोलणं स्वतः ऐकून घेणं असतं.
अडचणी सोडवण्याची कला
व्यवसाय उभा करताना रोज लहान-मोठ्या अडचणी येतच असतात. पण यशस्वी व्हायचं तर या साऱ्यावर मात करायला हवी. त्यासाठी आत्मविश्वास आणि तातडीने निर्णय घेण्याची क्षमता अंगी बाणवायला हवी. तुमचे इतरांशी असलेले चांगले-वाइट संबंधही अशावेळी कामाला येतात.
आर्थिक कौशल्य
व्यवसाय यशस्वी आहे की नाही हे अंतिमतः गल्ल्यावरच्या रकमेवरुनच मोजलं जातं. आर्थिक बाजू पहिल सांभाळली पाहिजे. दररोजचे व्यवहार , व्यवस्थापकीय खर्च , बेसिक अकौटिंग , टॅक्सेशन , आवश्यक सरकारी माहिती आणि ज्या व्यवसायात पडणार त्याची संपूर्ण आणि सखोल माहिती ठेवणं आवश्यक आहे. वेगवेगळे कोर्सेस, तज्ज्ञ व्यक्ती आणि इंटरनेटवरूनही अशी माहिती मिळवता येते.
टेक्निकल स्किल्स
कुठलाही व्यवसाय करताना त्याची पूर्ण माहिती हवीच. सुरूवातीला तशी नसली तरी नंतर नंतर अनुभवातून आणि तज्ज्ञांकडून किंवा पुस्तक आणि इतर सोर्सेसकडून तुम्ही ती मिळवणं गरजेचंच आहे. विनामाहिती काम करत असलात तर ते तुमच्या ग्राहकासाठी आणि अंतिमतः व्यवसायासाठी फायद्याचं नाही. अपडेटेड टेक्नॉलॉजीची माहितीही ठेवायला हवी.
सेल्स आणि मार्केटिंग
जेव्हा एखादा यशस्वी उद्योगपती त्याच्या व्यवसायासंबंधी बोलतो , तेव्हा ते आपल्याला ऐकावंसं वाटतं कारण आपण त्या कंपनीच्या सर्वात प्रभावी सेल्समनकडून अर्थात मालकाकडून ते ऐकत असतो. तुमच्या व्यवसायाविषयक काही असे मुद्दे काढून ठेवा की ज्याचा उपयोग कोणत्याही संभाषणाद्वारे उद्योग वाढीसाठी होऊ शकतो. मार्केटिंग म्हणजे फक्त जाहिरात नव्हे , तर तुमच्या ग्राहकापर्यंत पोहचण्यासाठी आणि त्यांना तुमच्या व्यवसायाविषयक माहिती देण्यासाठी वापरलेले अनेक प्रभावी मार्ग. यासाठी ग्राहकांची व मार्केटची सखोल माहिती हवी. याचबरोबर तुमचे प्रतिस्पर्धी कोणत्या प्रकारे मार्केटिंग करतात , ते प्रभावी आहे का ? याचा अभ्यास करून त्यातील काही मार्ग आपल्या व्यवसायात वापरू शकता. पण कोणाकडेही बाजारात नक्की काय चालेल हे सांगणारी जादूची छडी नाही.

- मेधा ताडपत्रीकर
मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१२
रविवारी इंग्रजी पेपर DNA मधले २ लेख वाचले आणि आख्या संडे ची वाट लागली...
कारण 'आदित्य सिन्हा' नावाच्या DNA च्या चीफ एडिटर आणि 'झैदी' एक कविता करणारी लेखिका यांच्या २ लेखांनी...
ह्या झैदी म्याडम ने म्हटले की,
"एका डॉक्टर चे क्लिनिक तोडले जाते कारण एक म्हातारा नेता म्हातारपणामुळे वारला...
ज्याने नागरिकांवर नेहमी फक्त हिंसा आणि खून लादले आणि त्यासाठी त्याला अटक झाली पण त्याला कधीही
त्याच्या गुन्ह्यासाठी शिक्षा झाली नाही. त्याऐवजी त्याच्या डेड बॉडीला राष्ट्रीय ध्वजामध्ये गुंडाळले...."
हे महाशय काय म्हणतात
"अमेरिकेतल्या न्यूयोर्क शहरात गेल्यावर तिथला पुतळा सगळ्यांचे स्वागत करतो,
पण ठाकरे उरलेल्या भारताला 'आमच्या घरापासून दूर राहा' हा संदेश देतात.
त्यामुळे तो पुतळा एक 'स्त्री' आहे आणि ठाकरे एक लहरी, विचित्र म्हतारा..
तो त्या लिबर्टी च्या पुतळ्याच्या विरुद्ध आहे.... तालिबान सारखा..."
अरे यांना आमचे वाकून पाहण्यापेक्षा यांच्या राज्यातली स्थिती जाऊन पाहायला सांगा...
तो सिन्हा जो एवढा बिहार बिहार करतोय तिथे अजूनही दलितांचे आख्खे गाव रात्रीत कापून टाकले जाते...
तिकडे बघ जमले तर...
आणि म्याडम ज्याला तुम्ही म्हातारा राजकारणी आणि गुन्हेगार म्हणता,
जरा खालचे दोन फोटो पहा आणि सांगा की एका गुन्हेगाराच्या मृत्यू नंतर एवढे लोक कशाला जमतील...
हे शीख बांधव अंतयात्रेला आलेल्या लोकांना पाणी वाटण्याचे काम कशाला करतील?
अरे तुम्हाला काय समजणार बाळासाहेब....
__________________________ ___________________
- काश्मिरी पंडितांचे हाल चालू असताना सगळा देश गप्प होता,
पण हा तोच माणूस होता ज्याने त्यांना आसरा दिला, शिक्षणात त्यांच्यासाठी तरतूद केली.
- १९८४ ला जेव्हा शीख विरोधी दंगल संपूर्ण भारतात पेटली असताना, आणि हजारो शीख मारले जात असताना,
हा तोच माणूस होता ज्याने मुंबईत एकही शिखाची हत्या होऊ दिली नाही.
त्यांचे रक्षण करण्याची सैनिकांना आज्ञा दिली...
- त्या माणसासाठी 'जय हिंद' हे नेहमी 'जय महाराष्ट्र' च्या आधी येत होते.
- आणि संपूर्ण भारताला एका दुव्यात बांधून ठेवणारी कुठली गोष्ट असेल तर ती 'हिंदुत्व' हीच आहे असे त्यांना वाटत होते...
त्यामुळे त्यांनी हिंदुत्वाची कास धरली...
- मुंबईतून अंडरवर्ल्ड जर बाहेर फेकले गेले असेल तर त्यासाठी सुद्धा हाच माणूस जबाबदार आहे..
कारण युतीच्या ४ वर्षाच्या सत्तेच्या काळात ४३० गुन्हेगारांचा एनकाउंटर करण्यात आला.
दाउद मुंबई सोडून गेला...
pls like this
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)