सोमवार, २० ऑगस्ट, २०१२

'रिझ्यूम' तयार करताना...

नोकरी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील 'टर्निंग पॉईंट' असतो. शिक्षण पूर्ण केल्यानंतर उत्तम जॉब मिळवणं हे तर प्रत्येकाच्या आयुष्याचे 'मिशन' असते तर नोकरी मिळाली पण त्यात 'सॅटीसफॅक्शन' नाही, असे चांगल्या 'ब्रेक'च्या प्रतिक्षेत असतात. त्यासाठी तुमचा 'सीव्ही' अर्थात 'रिझ्युम' देखील तितकाच ताकदीचा हवा. आकर्षक हवा. तुमचा 'सीव्ही' पाहताच तुम्हाला 'ऑफर लेटर' मिळावे असा छाप पाडणारा असायला पाहिजे. त्यासाठीच या काही टिप्स...

तुमच्यात असलेली कौशल्ये व त्या- त्या जॉबसाठी आवश्यक असलेली कौशल्ये यांची सांगड तुमच्या सीव्हीमध्ये व्यवस्थीत घातलेली असवी. काही ठिकाणी तुमच्याकडे असलेला अनुभव पुरेसा नसतो तर अशावेळी तुम्ही त्या-त्या पोस्टसाठी कसे 'फिट' आहे, हे 'रिझ्युम'मध्ये 'प्रेझेण्ट' करता आले पाहिजे. 

तुमचा 'रिझ्यूम' चांगला बनवण्यासाठी काही टिप्स :

* तुमचा 'रिझ्यूम' हा मुलाखत घेणार्‍याला तुमची ओळख करून देत असतो. त्यामुळे तुमचे शिक्षण, वैयक्तीक माहिती, अनुभव, आवडी- निवडी, विशेष गुण ह्यांची मुलाखत घेणार्‍यास कल्पना आली पाहिजे. 

* तुम्ही केलेले शिक्षण, कोसेर्सची माहिती, ज्या संस्थेतून केले त्याचे नाव अशा सर्व गोष्टी त्यात असाव्यात. तुमचं 'लेटेस्ट क्वालिफिकेशन' सर्वात वर असायला हवं.

* 'रिझ्यूम' हा तुम्ही तयार केला असल्याने त्याबद्दल तुम्हाला सखोल माहिती असणे आवश्यक असते. मुलाखत घेणार्‍याकडून त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. 'रिझ्यूम'मधील एखादा मुद्दा समजावून सांगताना गोंधळ होता कामा नये. त्यामुळे 'रिझ्यूम' स्वत:च्या शब्दांत आणि सोप्या भाषेतच लिहिला पाहिजे. 

* तुम्ही शिक्षणात तसेच आधीच्या नोकरीत विशेष प्राविण्य मिळवले असेल तर त्याला तुमच्या 'रिझ्यूम'मध्ये चांगले स्थान दिले पाहिजे. त्याची थोडक्यात पण संमर्पक माहिती दिली पाहिचे. 

* तुमच्या आवडी-निवडी, छंद या बाबी देखील महत्त्वाच्या आहेत. त्यांनाही तुमच्या 'रिझ्यूम'मध्ये स्थान मिळाले पाहिजे. 

* 'रिझ्यूम'मध्ये अनावश्यक गोष्टी लिहणे कटाक्षाने टाळावे. 

नोकरी म‍िळावी, तिच्यावरच आयुष्य खपवावं आणि वयाच्या 58 व्या वर्षी 'रिटायर्ड' व्हावं. हा आपल्या वडिलांचा काळ केव्हाच मागे पडला आहे. आजचे युग हे फास्ट झाले आहे. त्यामुळे दोन- तीन वर्षात नोकरी 'चेंज' करणे आजच्या यंगस्टर्सचे तर वैशिष्ट्य झाले आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा