रविवारी इंग्रजी पेपर DNA मधले २ लेख वाचले आणि आख्या संडे ची वाट लागली...
कारण 'आदित्य सिन्हा' नावाच्या DNA च्या चीफ एडिटर आणि 'झैदी' एक कविता करणारी लेखिका यांच्या २ लेखांनी...
ह्या झैदी म्याडम ने म्हटले की,
"एका डॉक्टर चे क्लिनिक तोडले जाते कारण एक म्हातारा नेता म्हातारपणामुळे वारला...
ज्याने नागरिकांवर नेहमी फक्त हिंसा आणि खून लादले आणि त्यासाठी त्याला अटक झाली पण त्याला कधीही
त्याच्या गुन्ह्यासाठी शिक्षा झाली नाही. त्याऐवजी त्याच्या डेड बॉडीला राष्ट्रीय ध्वजामध्ये गुंडाळले...."
हे महाशय काय म्हणतात
"अमेरिकेतल्या न्यूयोर्क शहरात गेल्यावर तिथला पुतळा सगळ्यांचे स्वागत करतो,
पण ठाकरे उरलेल्या भारताला 'आमच्या घरापासून दूर राहा' हा संदेश देतात.
त्यामुळे तो पुतळा एक 'स्त्री' आहे आणि ठाकरे एक लहरी, विचित्र म्हतारा..
तो त्या लिबर्टी च्या पुतळ्याच्या विरुद्ध आहे.... तालिबान सारखा..."
अरे यांना आमचे वाकून पाहण्यापेक्षा यांच्या राज्यातली स्थिती जाऊन पाहायला सांगा...
तो सिन्हा जो एवढा बिहार बिहार करतोय तिथे अजूनही दलितांचे आख्खे गाव रात्रीत कापून टाकले जाते...
तिकडे बघ जमले तर...
आणि म्याडम ज्याला तुम्ही म्हातारा राजकारणी आणि गुन्हेगार म्हणता,
जरा खालचे दोन फोटो पहा आणि सांगा की एका गुन्हेगाराच्या मृत्यू नंतर एवढे लोक कशाला जमतील...
हे शीख बांधव अंतयात्रेला आलेल्या लोकांना पाणी वाटण्याचे काम कशाला करतील?
अरे तुम्हाला काय समजणार बाळासाहेब....
__________________________ ___________________
- काश्मिरी पंडितांचे हाल चालू असताना सगळा देश गप्प होता,
पण हा तोच माणूस होता ज्याने त्यांना आसरा दिला, शिक्षणात त्यांच्यासाठी तरतूद केली.
- १९८४ ला जेव्हा शीख विरोधी दंगल संपूर्ण भारतात पेटली असताना, आणि हजारो शीख मारले जात असताना,
हा तोच माणूस होता ज्याने मुंबईत एकही शिखाची हत्या होऊ दिली नाही.
त्यांचे रक्षण करण्याची सैनिकांना आज्ञा दिली...
- त्या माणसासाठी 'जय हिंद' हे नेहमी 'जय महाराष्ट्र' च्या आधी येत होते.
- आणि संपूर्ण भारताला एका दुव्यात बांधून ठेवणारी कुठली गोष्ट असेल तर ती 'हिंदुत्व' हीच आहे असे त्यांना वाटत होते...
त्यामुळे त्यांनी हिंदुत्वाची कास धरली...
- मुंबईतून अंडरवर्ल्ड जर बाहेर फेकले गेले असेल तर त्यासाठी सुद्धा हाच माणूस जबाबदार आहे..
कारण युतीच्या ४ वर्षाच्या सत्तेच्या काळात ४३० गुन्हेगारांचा एनकाउंटर करण्यात आला.
दाउद मुंबई सोडून गेला...
pls like this
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा