शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३

दहावीची लेखी परीक्षा 3 मार्च 2014, तर बारावीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी 2014 पासून सुरू

बारावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून, दहावीची ३ मार्चपासून

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक सोमवारी जाहीर केले. बारावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा तीन मार्चपासून सुरू होणार आहे. बारावीच्या विज्ञान विषयांच्या पेपरमध्ये किमान तीन दिवसांचा असलेला खंड हे या वेळापत्रकाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

गेल्या वर्षीच्या वेळापत्रकात विज्ञान विषयांच्या पेपरदरम्यान पुरेशी ' गॅप ' नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. त्यामुळे बोर्डाला परीक्षेच्या आधी काही दिवस, जाहीर केलेले वेळापत्रक बदलावे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर, यंदा विज्ञान विषयांमध्ये कमीत कमी तीन दिवसांचा खंड ठेवण्यात आला आहे.

बोर्डाने या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, बारावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत होणार आहे. त्यामध्ये विज्ञान शाखेचा फिजिक्सचा पेपर २५ फेब्रुवारीला, गणिताचा पेपर १ मार्चला, केमिस्ट्रीचा पेपर ६ मार्चला आणि बायोलॉजीचा पेपर १० मार्चला होणार आहे. कॉमर्स शाखेच्या मुख्य विषयांच्या परीक्षेचा कालावधी २० फेब्रुवारी ते १० मार्च असा असून, आर्ट्स शाखेच्या मुख्य विषयांची परीक्षा २० फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान होईल.

यंदा एमसीव्हीसी सर्वसाधारण पायाभूत अभ्यासक्रम व तंत्र गटातील विषयांचा अभ्यासक्रम पुनर्रचित केलेला नसल्याने नियमित विद्यार्थ्यांना या विषयांची परीक्षा मार्च २०१३ च्या परीक्षेतील अभ्यासक्रमानुसार द्यावी लागेल.

दहावीची परीक्षा ३ मार्च ते २७ मार्च या कालावधीत होणार आहे. दहावीला मुख्य विषयांच्या पेपरदरम्यान किमान एक दिवसाची ' गॅप ' ठेवण्यात आली आहे.

हि माहिती महाराष्ट्र टाइम्स या वृत पत्रात प्रसिद्ध झाली आहे

बना आरटीओ निरीक्षक

आरटीओमध्ये ( महाराष्ट्र मोटार वाहन विभाग ) सहायक मोटार वाहन निरीक्षक हे पद असते . वाहनांची नोंदणी , तपासणी , विविध प्रकारचे वाहन परवाने ( लायसन्स ) देणे यासारखी तांत्रिक कामे यांना करावी लागतात .

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी एकूण २१५ जागा भरल्या जाणार आहेत . पूर्व मुख्य परीक्षेऐवजी मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार एकच परीक्षा १५ डिसेंबर २०१३ ला होईल .

वयोमर्यादा - किमान १९ वर्षे , कमाल ३३ वर्षे
शैक्षणिक पात्रता - दहावीनंतरील ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

अनुभव - मोठ्या गॅरेज वा कार्यशाळेमध्ये जड माल वाहतुक किंवा प्रवासी वाहन दुरुस्तीचे परिरक्षेचे पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून एक वर्ष काम केल्याचा अनुभव हवा .

अतिरिक्त आवश्यक अर्हता - मोटार सायकल , हलके मोटार वाहन , जड माल वाहतूक वाहन आणि जड प्रवासी वाहतूक वाहन चालवण्याचं कायमस्वरूपी लायसन्स उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे .

उमेदवाराला मराठी लिहीता , वाचता बोलता आले पाहिजे .

शारीरिक पात्रता -

पुरुष - उंची १६३ से . मी ., छाती - ८४ ( छातीचे किमान प्रसरण - सें . मी .)
महिला - उंची १५५ सें . मी ., वजन - किमान ४५ कि . ग्रॅ .
प्रवेश अर्ज - परीक्षेसाठी प्रवेश अर्ज केवळ ऑनलाईन स्वीकारण्यात येतील . ऑनलाईन प्रवेश अर्ज www.mahaonline.gov.in या वेबसाईटवरून भरावेत .

प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत नोव्हेंबर २०१३ आहे . सविस्तर जाहिरात , परीक्षेच्या अभ्यासक्रमांसाठी तसेच जुन्या प्रश्नपत्रिकांसाठी www.mpsc.gov.in ही वेबसाईट पहावी .
मुख्य परीक्षा अभ्यासक्रम - मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ ( बहुपर्यायी ) स्वरूपाची असून एकच प्रश्नपत्रिका असेल . प्रश्नपत्रिकेमध्ये मेकॅनिकल ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग विषयावर प्रश्न विचारले जातील . प्रश्नांचा दर्जा पदविकास्तरावरील असेल .

१५० प्रश्नांसाठी ३०० गुण असतील . परीक्षेचा कालावधी दीड तास असून माध्यम इंग्रजी असेल .

- आनंद मापुस्कर  

nokari