शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३

बना आरटीओ निरीक्षक

आरटीओमध्ये ( महाराष्ट्र मोटार वाहन विभाग ) सहायक मोटार वाहन निरीक्षक हे पद असते . वाहनांची नोंदणी , तपासणी , विविध प्रकारचे वाहन परवाने ( लायसन्स ) देणे यासारखी तांत्रिक कामे यांना करावी लागतात .

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी एकूण २१५ जागा भरल्या जाणार आहेत . पूर्व मुख्य परीक्षेऐवजी मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार एकच परीक्षा १५ डिसेंबर २०१३ ला होईल .

वयोमर्यादा - किमान १९ वर्षे , कमाल ३३ वर्षे
शैक्षणिक पात्रता - दहावीनंतरील ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

अनुभव - मोठ्या गॅरेज वा कार्यशाळेमध्ये जड माल वाहतुक किंवा प्रवासी वाहन दुरुस्तीचे परिरक्षेचे पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून एक वर्ष काम केल्याचा अनुभव हवा .

अतिरिक्त आवश्यक अर्हता - मोटार सायकल , हलके मोटार वाहन , जड माल वाहतूक वाहन आणि जड प्रवासी वाहतूक वाहन चालवण्याचं कायमस्वरूपी लायसन्स उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे .

उमेदवाराला मराठी लिहीता , वाचता बोलता आले पाहिजे .

शारीरिक पात्रता -

पुरुष - उंची १६३ से . मी ., छाती - ८४ ( छातीचे किमान प्रसरण - सें . मी .)
महिला - उंची १५५ सें . मी ., वजन - किमान ४५ कि . ग्रॅ .
प्रवेश अर्ज - परीक्षेसाठी प्रवेश अर्ज केवळ ऑनलाईन स्वीकारण्यात येतील . ऑनलाईन प्रवेश अर्ज www.mahaonline.gov.in या वेबसाईटवरून भरावेत .

प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत नोव्हेंबर २०१३ आहे . सविस्तर जाहिरात , परीक्षेच्या अभ्यासक्रमांसाठी तसेच जुन्या प्रश्नपत्रिकांसाठी www.mpsc.gov.in ही वेबसाईट पहावी .
मुख्य परीक्षा अभ्यासक्रम - मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ ( बहुपर्यायी ) स्वरूपाची असून एकच प्रश्नपत्रिका असेल . प्रश्नपत्रिकेमध्ये मेकॅनिकल ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग विषयावर प्रश्न विचारले जातील . प्रश्नांचा दर्जा पदविकास्तरावरील असेल .

१५० प्रश्नांसाठी ३०० गुण असतील . परीक्षेचा कालावधी दीड तास असून माध्यम इंग्रजी असेल .

- आनंद मापुस्कर  

nokari

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा