यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निदान शहरी व निम्नशहरी भागात सोशल
इंजिनिअरिंगचा प्रयोग होणार, हे जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी नेत्यांनी
हेरले. दिल्लीतील रामलीला मैदानावरील अण्णा हजारे यांच्या आन्दोलनाप्रसंगी
सोशल मीडियाची प्रथम ताकत दिसून आली. त्यानंतर आम आदमी पक्षाने दिल्लीच्या
विधानसभा निवडणुकित याचा प्रभावी वापर केल्याने सत्तेपर्यंत पोहचता येईल,
हे अनेकांनी जाणले. हे इंजिनीअरिंग साधण्यासाठी सोशल माध्यमाचा सर्वाधिक
उपयोग करणार्या तरुणांनाच आता राजकीय पक्षांनी आपल्या कॅम्पेनिंगमध्ये
सहभागी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे एरवी परीक्षानंतर समर जाब्सचा शोध
घेणार्या तरुणांसाठी चक्क इलेक्शन जाब्स मिळाले आहेत. अगदी घरबसल्या सोशल
नेटवर्किंगच्या मदतीने तरुणाई पाकेटमनी कमावत आहे. देशाच्या इतिहासातील
लोकसभेची ही 16 वी निवडणूक डिजिटल प्रचाराची पहिलीच निवडणूक ठरणार आहे.
फेसबुक, ट्विटर, गुगल प्लस आणी यूट्युबसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवरुन
तरुणाईला आकर्षित करण्यासाठी रजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अनेक
उमेदवारांचा हा सोशल प्रचार अंतिम टप्प्यात आहे, या नव्या डिजिटल फ्रंटवर
अनेक तरुण मुले किल्ला लढवत आहेत. काही दिवसांवर आर्मीमध्ये सहभागी
होण्याचा चांगल्या संधी आहेत. इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन आफ इंडियाच्या
अहवालानुसार जून, 2014 मध्ये देशातील 120 कोटी जनतेपैकी सधारणतः 24 कोटी
लोकांपर्यंत इंटरनेट पोहचलेले असेल. इंटरनेट वापरणार्यामध्ये सोशन
नेटवर्किंग वापरणार्या तरुणांचा वाटा मोठा आहे. 18 ते 24 वयोगटतील 16 कोटी
तरुण मतदार या वषीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्यामुळे
ही पिढी टार्गेट करण्यासाठी सर्वच रजकीय पक्षानी आपली डिजिटल आर्मी तयार
केल्या आहेत.
1) स्किल्स
2) सोशल नेटवर्किंगची चांगली जाण
3) ताज्या राजकीय घडामोडीची माहिती
4) फोटोशापचे जुजबी ज्ञानी
5) संवाद कौशल्य
6) कामे
7) फेसबुक, ट्विटर पेज अॅडमिन
8) ब्लाग लिहिणे
9) फोटोशाप, व्हिडीओ एडिटिंग
तरुण मतदारांना काय भावेल आणी काय नाही याचा अंदाज तरुण लोक जास्ता चांगल्या प्रकारे घेऊ शकतात.
प्रचारात व्यस्त असल्याने अनेकाना आपले अकाऊंट हाताळणे कठीण जाते
टेक्नोलॉजीबद्दल तरुण मुले जास्त अपडेटेड
असतात. आपली पोस्ट जास्तीत जास्त कशी शेअर होईल व अधिक लोकांपर्यंत पोहोचेल
याकडे ते विशेष लक्ष देतात.
सोशल नेटवर्किंगवर काम असल्याने तरुण मुले अधिक उत्साहाने काम करण्यास तयार असतात.
अकाऊंट आयडी आणि पासवर्ड दिल्यास कोठूनही आणि कधीही हे पेज अॅडमिन्स पेज अपडेट करण्यास तयार असतात.
प्रत्येक उन्हाळी सुट्टीत तीन महिन्यांचा
समर जाब करुन पैसे कमवण्यापेक्षा हा पर्याय जास्त फायदेशीर आहे. अनेकदा या
कामाची सर्टीफिकेट्स मिळत नसली तरी आपला संपर्क वाढवण्यासाठी आणी नवीन काही
तरी शिकण्यासाठी तरुणाईला या उन्हाळ्यात हा पर्याय उपलब्ध झाला आहे.
पब्लिक रिलेशन, मीडिया, मार्केटिंग, प्रमोशंस, इव्हेन्ट्सारख्या क्षेत्रात
करियर करण्याची इच्छा असणार्यांसाठी फर्सट हॅण्ड अनुभव घेण्याची चांगली
संधी आहे.https://www.facebook.com/jobs.fair
This website provides jobs information Get Updates for all Govt jobs, Bank jobs, Software, Results, Answer key, Admit card, Recruitment, Drives, openings fresher’s and experience candidates.
उत्तर द्याहटवाjobsway
Bihar Job Portal Says thank You Very Much For Best Content I Really Like Your Hard Work. Thanks
उत्तर द्याहटवा9curry Says thank You Very Much For Best Content I Really Like Your Hard Work. Thanks
amcallinone Says thank You Very Much For Best Content I Really Like Your Hard Work. Thanks