शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१२
सोमवार, २४ सप्टेंबर, २०१२
How to lock any file or folder without any software
Most of us have private data. Not all of us have a private computer to keep that data. So, we just end up with other people viewing that data. Although password protecting software do work, it is almost useless to hide private data with these software(because we are always questioned as to what it is that we are hiding with the help of these software).
Hidden folders do not work as they can be easily searched with Windows Search. So, we need an alternative way to create hidden password protected folders which only we can access. And that is exactly what we will learn in this post.
With this trick, you can create a secure password protected folder in Windows which no one except you can access. To use this trick, follow the instructions given below:-

- 1. Open Notepad.
- 2. Copy and paste the exact code given below:-
cls
@ECHO OFF
title computer-tricks-corner.blogspot.com
if EXIST "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}" goto UNLOCK
if NOT EXIST MyFolder goto MDMyFolder
:CONFIRM
echo Are you sure to lock this folder? (Y/N)
set/p "cho=>"
if %cho%==Y goto LOCK
if %cho%==y goto LOCK
if %cho%==n goto END
if %cho%==N goto END
echo Invalid choice.
goto CONFIRM
:LOCK
ren MyFolder "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}"
attrib +h +s "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}"
echo Folder locked
goto End
:UNLOCK
echo Enter password to Unlock Your Secure Folder
set/p "pass=>"
if NOT %pass%== computer-tricks-corner.blogspot.com goto FAIL
attrib -h -s "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}"
ren "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}" MyFolder
echo Folder Unlocked successfully
goto End
:FAIL
echo Invalid password
goto end
:MDMyFolder
md MyFolder
echo MyFolder created successfully
goto End
:End
- 3. Click on the File Menu. Click on Save As.
- 4. Select All Types (or all files) in the Save As Type dropdown menu. Save the file as *.bat or Locker.bat
To re-view your folder, double click on the saved batch file. Enter password as
" computer-tricks-corner.blogspot.com " without quotes ("") and press Enter key. This is also the default password. Your folder will be visible again.
To change the default password, edit the part of the code given in blue and enter your own password.
The overall usability of this trick can be improved by deleting the batch file after hiding your folder and re-creating it when you wish to access your folder again.
If you face any problem using this trick, you can write a comment and I will do my best to help you.
Note : This works on Windows 7, Windows XP and Vista. First try this on useless data to be sure and then only hide your personal data.
LRcreation
रविवार, ९ सप्टेंबर, २०१२
डिग्री महत्वाची का ज्ञान महत्वाचे?
ही माझ्या एका मित्राची सत्यकथा आहे. शाळेमधे असताना त्याचे हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर होते. त्याचे भाषा वीषय चांगले होते. त्याला मराठी, हिंदी या वीषयांच्या पेपरात चांगले मार्क्स पडायचे. आमच्या ग्रुपमधे बर्यातच जणांचा ओढा इंजिनीयरींगकडे होता. म्हणुन त्याने पण इंजिनीयरींगकडे जायचे ठरवले. त्याचे भाषा वीषय चांगईले आहेत म्हणुन त्याने आर्टसकडे जावे असे मी त्याला सुचवले तर त्याने मला वेड्यात काढले. पुर्वी इंजिनीअरींगच्या डिग्रीच्या ( बी.ई.) ऍडमीशन साठी कॉलेजची पी.डी.( प्री डिग्री ) व इंटर ( इंटर सायन्स ) अशी दोन वर्षे करावी लागत. ज्यांना इंटरला फर्स्ट क्लास मिळे त्यांनाच पुढे बी.ई. ला ऍडमीशन मिळे. माझा मित्र हा तसा गरीब मध्यमवर्गीय परिस्थितितुन आलेला. तरी सुध्धा त्याने हट्टाने कॉलेजमधे पी.डी. सायन्सला ऍडमीशन घेतली. इंटरला फर्स्ट क्लास मिळावा म्हणुन एक वर्ष ड्रॉप घेतला. इंटरला फर्स्ट क्लास मिळाला नाही म्हणुन इंजिनीयरींगच्या डिप्लोमाला ऍडमीशन घेतली. तीन वर्षांचा डिप्लोमा खस्ता खात पांच वर्षांत पुर्ण केला. म्हणजे मॅट्रीक झाल्यावर तो आठ वर्षे, म्हणजे पहिली ते आठवी, शीकत होता. इंजिनीयरींगमधील डिप्लोमा मिळाल्यावर तो एखाद्या कारखान्यात किंवा कंपनीत नोकरिला लागेल असा आमचा अंदाज होता. पण तो मित्राच्या ओळखिने स्टेट बँकेमधे कॅशीयर म्हणुन नोकरीस लागला. त्याला ती नोकरी आवडली. पुढे त्या नोकरीत प्रमोशन्स मिळावीत म्हणुन त्याने बी. ए. इकॉनॉमिक्स केले व स्टेट बँकेतुन उच्च पदावरुन निवृत्त झाला. इंजिनीयर होण्याच्या हव्यासापायी त्याने त्याच्या आयुष्याची आठ अमुल्य वर्षे वाया तर घालवलीच. पण इंजिनीयर झाल्यावर त्याने आपल्या या ज्ञानाचा काहीच उपयोग केला नाही त्याचे काय?
पुण्याच्या डिझेल इंजिने बनविणार्या एका कारखान्यात मी नोकरिला होतो. त्यावेळी राधाकृष्णन ( आम्ही त्याला राधा म्हणायचो ) नावाचा बी. ए. झालेला एक केरळी तरुण स्टेनो म्हणुन नोकरिला लागला. त्याला डिझेल इंजिनांमधे गोडी वाटु लागली. रोज तो आपली शिफ्ट संपल्यावर तासंतास वर्कशॉपमधे जाऊन बसत असे. तिथल्या माणसांना विचारुन विचारुन इंजिनाची व त्याला लागणार्याब महत्वाच्या पार्टसची माहिता घेत असे. त्यावर सुरेख नोट्स बनवत असे. इंजिनात काय काय बदल झाले आहेत व त्याची कारणे काय काय आहेत याचे त्याने सुरेख रेकॉर्ड ठेवले होते. अर्धात तो हे छंद म्हणुन करत होता. याचा त्याच्या नेहमिच्या कामाशी काही संबंध नव्हता. एकदा इंजिनामधे काहीतरी मोठा प्रॉब्लेम आला. तो सोडविण्यासाठी राधाच्या नोट्स उपयोगी पडल्या. कंपनिने त्याचो टॅलेन्ट ओळखले व त्याचे लंडनला ‘सर्व्हिस मॅनेजर’ म्हणुन पोस्टींग केले. त्याने पण बरीच वर्षे सर्व्हिस मॅनेजर म्हणुन उत्तम काम केले.
एक डिप्लोमा होल्डर इंजिनीयर स्टेट बँकेत कॅशीयर होतो. तर एक बी.ए.झालेला माणुस उत्तम इंजिनीयर होऊ शकतो हे कशाचे द्योतक आहे?
नुकतेच ऍपलच्या स्टिव्ह जॉब्जचे नीधन झाले. अमेरीकन तज्ञांच्या मते स्टिव्ह जॉब्ज हा थॉमस अल्वा एडीसन नंतरचा सर्वात हुषार व कल्पक इंजिनीयर म्हणुन ओळाखला जाईल. एडीसन हा फक्त चौथी पर्यंत शीकलेला होता. तर स्टिव्ह कॉलेजमधे फक्त एक सेमिस्टर एव्हडाच शीकलेला होता. त्यांच्याकडे इंजिनीअरींगची कोठलिही डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट वा क्वालिफिकेशन नव्हते. मग ते जगातले सर्वश्रेष्ठ इंजिनीयर्स कसे होऊ शकले?
शिक्षणाचा मुळ उद्देश ज्ञान देणे, कौशल्य वाढविणे, नवीन कौशल्य निर्माण करणे हा आहे. पण हल्ली शीक्षणाचा मुळ उद्देश डिग्रया व त्याची सर्टिफिकेटस देणे हा असावा असे वाटु लागले आहे. हल्ली शीक्षणातुन मीळणार्याय ज्ञानाकेक्षा त्यातुन मीळणार्यास डिग्रिला व डिग्रिच्या सर्टिफिकेटला नको येव्हडे महत्व प्राप्त झाले आहे. येन केन प्राकाराने एखादी डिग्री मीळवायची व त्या जोरावर एखादी चांगली नोकरी पटकावयाची असे अनेक लोकांचे प्लॅनींग असते. डिग्री हाच अनेकांच्या आयुष्याचा मुख्य पाया झाला आहे. मग डिग्री मीळविण्यासाठी अनेक परिक्षा द्याव्या लागतात. परिक्षेतील मार्कांवर ग्रेड ठरते. त्यावर पुढील भवितव्य ठरते. मग परिक्षेत पास होण्याचे, त्यात भरपुर मार्क्स मिळविण्याचे अनेक शॉर्ट कट्स उपलब्ध झाले आहेत. ते विद्यार्थांना ज्ञानार्थी बनविण्याऐनजी परिक्षार्थी बनवत आहेत. त्यामुळे ज्ञानापेक्षा डिग्रिला जास्त महत्व प्राप्त झाले आहे.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास हे कधी कुठल्या शाळा कॉलेजमधे गेल्याचे किंवा त्यांच्या कडे कुठले डिग्री सर्टिफिकेट असल्याचे अजुनपर्यंत तरी आढळुन आलेले नाही. पण त्यांनी लिहिलेले ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, रामदास स्वामिंचे दासबोध व मनाचे श्लोक हे ग्रंथ अजुनही लोकप्रीय आहेत. पिढ्यांन पिढ्या भक्तिभावाने त्यांचे वाचन व मनन चालु आहे. अजुनही हे ग्रंथ मरठितील ‘बेस्ट सेलर’ कॅटेगरितल्या पुस्तकात मोडतात.
लक्षमणराव किर्लोस्कर ड्रॉइंग टीचर होते. तर धिरुभाई अंबानी फक्त मॅट्रीकपर्यंत शीकलेले होते. त्यांच्याकडे इंजिनीअरींग किंवा मॅनेजमेन्ट मधले कोणत्याही तर्हेपचे डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट किंवा क्वालि॑फिकेशन नव्हते. लक्षमणराव किर्लोस्करांनी किर्लोस्कर उद्योग समुहाची स्थापना केली. इंजिनीयरींगच्या क्षेत्रातील तो एक आघाडिचा उद्योग समुह म्हणुन ओळखला जातो. धिरुभाई अंबानिंनी रिलायन्स उद्योग समुहाची स्थापना केली. आज भारतातीतल खाजगी क्षेत्रातील सर्वांत मोठा उद्योग समुह म्हणुन रिलायन्स ओळखला जातो. अशी अनेक उदाहरणे आहेत.
कोणत्याही प्रकारची डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट किंवा कसलेही क्वालिफिकेशन नसताना वरील लोकांना हे कसे जमले? कारण त्यांनी ज्ञानाचे महत्व ओळखले होते. डिग्री आणि ज्ञान यातला फरक ते जाणुन होते. पण नुसतेच ज्ञान मीळवायचे नाही. तर प्रत्यक्ष जीवनात त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता याईल या दृष्टिने पण ते सतत प्रायत्नशील राहिले.
ज्ञान मिळविण्याच्या मार्गात कधी शॉर्ट कटस नसतात. ज्ञान मिळविण्याचे अनेक मार्ग असतात. शाळा कॉलेजमधील शीक्षण हा एक मार्ग असतो. पण तो काही एकमेव मार्ग नव्हे. अर्थात ज्ञान मिळविण्याचा मार्ग खडतर तसेच वेळ घेणारा असतो. ज्या विषयाचे ज्ञान घ्यायचे त्याची मुळात आवड असावी लागते. अनेक लोकांना तांत्रीक वीषयात रुची असते. पण सगळ्यांनाच तंत्रशीक्षण घेणे जमतेच असे नव्हे. तंत्र शीक्षणाची कुठली पदवी किंवा सर्टिफिकेट आपल्याकडे नाही म्हणुन आपण काही करु शकणार नाही असे वाटुन ते आपल्यातील तांत्रीक वीषयातील रुची मारुन टाकत असतात. पण असे लोक सुध्धा उत्तम इंजिनीयर्स होऊ शकतात हे एडीसन किंवा स्टिव्ह जॉब्ज सारख्या लोकांनी दाखवुन दिले आहे.
याचा अर्थ लोकांनी डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट्स किंवा क्वलिफिकेशन्स मीळवु नयेत असा होत नाही. शीक्षण, मग ते कोणत्याही प्रकारचे असो, त्याला काही ना काहीतरी महत्व हे असतेच. तसेच प्रत्येक डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेटला महत्व हे असतेच. पण त्याहिपेक्षा ज्ञानाला जास्त महत्व असते हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. डिग्री मिळाली, सर्टिफिकेट मिळाले म्हणजे आपले शीक्षण संपले असे समजु नये. तसेच शीक्षण घेताना त्यातुन मीळणार्या ज्ञानाला जास्त महत्व द्यावे, डिग्रिला नव्हे. कारण येणारा जमाना हा ज्ञानी लोकांचा आहे, क्वालिफाईड लोकांचा नाही हे लक्षात घ्यावे..
बुधवार, २९ ऑगस्ट, २०१२
विविध राज्यांतील गणेश
विविध राज्यांतील गणेश काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभरात अनेक ठिकाणी गणेशस्थाने आहेत. त्यांपैकी काही परिचित, तर अनेक अपरिचित आहेत. त्यांपैकी काही स्थानांची थोडक्यात माहिती
गोवा खांडोळ्याचा गणपती कामाक्षीदेवी कामरूपहून (आसाम) गोव्यात आली, त्याचप्रमाणे हा गणपतीही तिकडूनच आला अशी लोकांची श्रद्धा आहे. तिसवाडी तालुक्यात दिवाडी गावाच्या नावेली येथे हा गणपती होता. 1560मध्ये या गणपतीची मूर्ती फोंडे तालुक्यातील खंडेपार येथे आणण्यात आली. नावेलीचे शेणवी नावेलकर हे गणेशभक्त. गणेशाची मूर्ती हलविल्याने त्यांना खंडेपार येथे जाणे अवघड होऊ लागले.एका धनत्रयोदशीच्या रात्री नावेलकर मंडळींनी ही मूर्ती खंडेपार येथून पळविली. दिवाळीच्या पहाटे खंडेपारकरांना देवळात मूर्ती दिसेना म्हणून ते मूर्ती शोधण्यासाठी निघाले. भाणस्तारच्या खाडीतून मूर्ती नेताना नावेलकरांना त्यांनी पकडले. दोघांत प्रचंड वादावादी झाली, नंतर ठरले की दोघांनाही येण्याजाण्यासाठी सोयीच्या ठिकाणी मूर्ती ठेवावी. त्यानुसार पणजी व फोंड्यापासून सारख्या अंतरावर असलेल्या खांडोळे या गावी मूर्तीची स्थापना करण्यात आली. नरक चतुर्दशीच्या दिवशी मूर्ती गावातून गेली म्हणून शेणवी खंडेपारकर अजूनही दिवाळी साजरी करत नाहीत, तर दिवाळीच्या दिवशी मूर्ती गावी आणता आली नाही म्हणून नावेलकरही दिवाळी साजरी करत नाहीत. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला समेट झाल्याने दोन्ही घराण्यांत दीपोत्सव साजरा करण्यात येतो. या गणपतीचे मंदिर खांडोळ्याला डोंगराच्या पायथ्याशी नारळांच्या आगरात आहे. पाषाणाची भव्य गणेशमूर्ती विराजमान आहे.
पुनळेकरांचा गणपती बार्देश महालात बस्तांदे येथे पुतळे वाडी आहे. तेथे गणपतीचे देऊळ होते. ते पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केले. त्यामुळे तेथील मूर्ती पेडणे महालातील धारगळ गावी नेण्यात आली. या गणपतीस पुनळेकरांचा गणपती म्हणतात.
हरमलचा गणेश हरमल येथे इतिहासप्रसिद्ध नारायणाचे देऊळ आहे. ते आता पडक्या स्थितीत आहे. या मंदिरात गणेशाची स्थापना केली आहे. पोर्तुगिजांनी गणेशपूजनास बंदी घातल्याने भिंतीवरील चित्राची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली. अजूनही काही सारस्वत कुटुंबे कागदावरील गणपतीचे पूजन भाद्रपदात करतात.
कर्नाटक कौण्डिण्य महागणपती
कुरुडुमळे (जि. कोलार) या गावात हे गणपती मंदिर आहे. कौण्डिण्य ऋषींचा आश्रय या ठिकाणी होता, त्यामुळे याला "कौण्डिण्य क्षेत्र' असेही संबोधिले जाते. त्रिपुरासुराशी लढायला जाण्यापूर्वी ब्रह्मा,विष्णू व महेश आणि इतर देवांनी या ठिकाणी महागणपतीची आराधना केली होती, म्हणून याला गणेशगिरी किंवा कुटाचल असेही संबोधले जाते. येथील महागणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय गणेशयात्रा पूर्ण होत नाही, अशी धारणा आहे. मंदिराच्या मुख्य देवळाच्या गर्भगृहात महागणपतीची मूर्ती नऊ फूट उंचीची असून, हिरव्या संगमरवराची आहे.
इडगुंजी महागणपती इडगुंजी गावातील हा गणपती पंचखाद्यप्रिय महागणपती म्हणून ओळखला जातो. हे गाव गोकर्ण क्षेत्रापासून 25 मैलांवर आहे. एकदा नारद पार्वतीकडे गेले होते, तेथे गणपती गोड खाऊसाठी रडत होता. त्या वेळी नारदांनी आश्वासन दिले, की तुला रोज पंचखाद्य इत्यादी गोड खाऊ देववितो, तू माझ्याबरोबर शरावती काठी इडाकुंज क्षेत्री चल. पुढे तेथे विश्वकर्म्याने गणेशाची स्थापना केली,अशीकथा आहे. ही गणेशाची द्विहस्त मूर्ती आहे. बालब्रह्मचारी रूपातील ही मूर्ती आहे. विशेष म्हणजे या मूर्तीचे डोळे अतिशय बारीक असून, दोन्ही सुळे सारख्या आकाराचे आहेत. इडलीसारखा पदार्थ मूर्तीच्या चारी बाजूंनी डोक्यापर्यंत अर्पण करण्याची पद्धत येथे आहे. दुपारच्या आरतीच्या वेळी पंचखाद्य नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे.
गोकर्ण
राक्षसाधीश रावणाच्या हातून शंकराचे आत्मलिंग वाचविणारा ब्राह्मण बटूच्या रूपातील गणेश म्हणून गोकर्णच्या गणेशाची ख्याती आहे. ही दोन हाती उभी सुमारे पाच फूट उंचीची पाषाणमूर्ती आहे. ही मूर्ती पाचव्या शतकातील असावी. या मूर्तीला मुकुट नाही. रावणाने ठोसा मारल्याची खूण या मूर्तीच्या डोक्यावर दाखविली जाते. हा गणपती गोकर्ण महाबळेश्वरच्या आवारातच; पण स्वतंत्र मंदिरात आहे.
तमिळनाडू शंकराचार्यस्थापित गणेश श्रीरंगम स्थानकाच्या जवळच जंबुकेश्वराचे मंदिर आहे. त्याच्या शेजारीच जगदंबेचे मंदिर आहे. या मंदिराच्या समोरच गणेशमंदिर आहे. ही मूर्ती शंकराचार्यांनी स्थापन केली आहे. जगदंबेची मूर्ती पूर्वी तेजस्वी आणि उग्र होती. तिचे उग्र तेज शांत करण्यासाठी शंकराचार्यांनी गणेशाची स्थापना तिच्यासमोरच केली अशी कथा सांगितली जाते.
उत्तर प्रदेश धुंडीराज (श्रीक्षेत्र काशी) काशीविश्वेश्वराच्या मंदिराच्या परिसरात ही गणेशमूर्ती आहे. भारतातील 21 गणेशस्थानांपैकी हे एक स्थान आहे. भस्मासुराचा मुलगा दुरासद याचा नाश करण्यासाठी देवांच्या प्रार्थनेवरून दिव्य अवतार धारण करून त्याचा नाश केला, अशी कथा आहे. काशी क्षेत्रात 56 विनायक असल्याची नोंद आहे.
sakal.com

सोमवार, २० ऑगस्ट, २०१२
'रिझ्यूम' तयार करताना...
नोकरी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील 'टर्निंग पॉईंट' असतो. शिक्षण पूर्ण केल्यानंतर उत्तम जॉब मिळवणं हे तर प्रत्येकाच्या आयुष्याचे 'मिशन' असते तर नोकरी मिळाली पण त्यात 'सॅटीसफॅक्शन' नाही, असे चांगल्या 'ब्रेक'च्या प्रतिक्षेत असतात. त्यासाठी तुमचा 'सीव्ही' अर्थात 'रिझ्युम' देखील तितकाच ताकदीचा हवा. आकर्षक हवा. तुमचा 'सीव्ही' पाहताच तुम्हाला 'ऑफर लेटर' मिळावे असा छाप पाडणारा असायला पाहिजे. त्यासाठीच या काही टिप्स...
तुमच्यात असलेली कौशल्ये व त्या- त्या जॉबसाठी आवश्यक असलेली कौशल्ये यांची सांगड तुमच्या सीव्हीमध्ये व्यवस्थीत घातलेली असवी. काही ठिकाणी तुमच्याकडे असलेला अनुभव पुरेसा नसतो तर अशावेळी तुम्ही त्या-त्या पोस्टसाठी कसे 'फिट' आहे, हे 'रिझ्युम'मध्ये 'प्रेझेण्ट' करता आले पाहिजे.
तुमचा 'रिझ्यूम' चांगला बनवण्यासाठी काही टिप्स :
* तुमचा 'रिझ्यूम' हा मुलाखत घेणार्याला तुमची ओळख करून देत असतो. त्यामुळे तुमचे शिक्षण, वैयक्तीक माहिती, अनुभव, आवडी- निवडी, विशेष गुण ह्यांची मुलाखत घेणार्यास कल्पना आली पाहिजे.
* तुम्ही केलेले शिक्षण, कोसेर्सची माहिती, ज्या संस्थेतून केले त्याचे नाव अशा सर्व गोष्टी त्यात असाव्यात. तुमचं 'लेटेस्ट क्वालिफिकेशन' सर्वात वर असायला हवं.
* 'रिझ्यूम' हा तुम्ही तयार केला असल्याने त्याबद्दल तुम्हाला सखोल माहिती असणे आवश्यक असते. मुलाखत घेणार्याकडून त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. 'रिझ्यूम'मधील एखादा मुद्दा समजावून सांगताना गोंधळ होता कामा नये. त्यामुळे 'रिझ्यूम' स्वत:च्या शब्दांत आणि सोप्या भाषेतच लिहिला पाहिजे.
* तुम्ही शिक्षणात तसेच आधीच्या नोकरीत विशेष प्राविण्य मिळवले असेल तर त्याला तुमच्या 'रिझ्यूम'मध्ये चांगले स्थान दिले पाहिजे. त्याची थोडक्यात पण संमर्पक माहिती दिली पाहिचे.
* तुमच्या आवडी-निवडी, छंद या बाबी देखील महत्त्वाच्या आहेत. त्यांनाही तुमच्या 'रिझ्यूम'मध्ये स्थान मिळाले पाहिजे.
* 'रिझ्यूम'मध्ये अनावश्यक गोष्टी लिहणे कटाक्षाने टाळावे.
नोकरी मिळावी, तिच्यावरच आयुष्य खपवावं आणि वयाच्या 58 व्या वर्षी 'रिटायर्ड' व्हावं. हा आपल्या वडिलांचा काळ केव्हाच मागे पडला आहे. आजचे युग हे फास्ट झाले आहे. त्यामुळे दोन- तीन वर्षात नोकरी 'चेंज' करणे आजच्या यंगस्टर्सचे तर वैशिष्ट्य झाले आहे.

सोमवार, १३ ऑगस्ट, २०१२
नोकरीसाठी जाताना....
| ||||||
रविवार, २९ जुलै, २०१२
जेईई-आयआयटीसाठी अशी तयारी करा!
आयआयटी-जेईई ही परीक्षा सर्वात कठिण परीक्षांमध्ये गणली जाते. अभियांत्रिकी परीक्षांची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी ही परीक्षा देऊ इच्छितो. म्हणूनच दरवर्षी जवळपास दोन लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. आणि त्यातील फक्त तीन हजार विद्यार्थीच पास होतात.
दोन लाख विद्यार्थ्यांमधून फक्त तीनच हजार विद्यार्थी का बरे पास होतात? याच तुम्ही कधी विचार केलाय? ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी जीव तोडून प्रयत्न करतात, पण ज्या विद्यार्थ्यांची रणनीती अचूक असते, तेच यशस्वी होतात.
साधारणपणे या परीक्षेची तयारी केव्हापासून सुरू करावी हा प्रश्न प्रत्येकाला भेडसावत असतो. त्यासाठी विद्यार्थ्यांजवळ तीन पर्याय असतात....
बारावीनंतर ड्रॉप घेऊन
अकरावीदरम्यान
बारावीत असताना
आयआयटी-जेईईच्या सध्याच्या अभ्यासक्रमानुसार, विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी फक्त दोनच संधी मिळतात. पहिली, विद्यार्थी बारावीत असताना आणि दुसरी तो बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला असेल त्यावेळी. अशा परिस्थितीत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच या परीक्षेचा अभ्यास सुरू करणे योग्य ठरेल. दहावी उत्तीर्ण झाल्याच्या काळात एकतर विद्यार्थी उत्साही असतो आणि आव्हान स्वीकारण्याची त्याची तयारी असते.
विद्यार्थ्याच्या मुलभूत संकल्पना स्पष्ट असतील तर त्याला फार अडथळे येत नाहीत. त्यासाठी आवश्यक आहे अचूक रणनीती आणि काही छोट्या-छोट्या गोष्टीवर लक्ष देण्याची. त्यामुळे या परीक्षेसाठी आधीच एक रणनीती आखा आणि खाली दिलेल्या गोष्टींवर लक्ष द्या....
आत्मविश्वास
सुरवात नेहमी सकारात्मक दृष्टिकोण आणि आत्मविश्वासाने करावी. परीक्षेसंबंधात कुठलीही द्विधा मनस्थिती ठेवू नका. 'मी सर्व करू शकतो' असे मानून स्वतः:वर विश्वास ठेवा.
तयारी
या परीक्षेची तयारी अकरावीतच सुरू करा. पहिल्या शंभरात येणार्या विद्यार्थ्यांमध्ये अशाच विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते.
नेमके मार्गदर्शन
परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंग क्लास आणि पत्राद्वारे देण्यात येणार्या अभ्यासक्रमाची निवड करताना आधी त्यासंबंधी संपूर्ण माहिती मिळवा. त्यानंतरच निवड करा.
लक्ष केंद्रीत करा
एकाबरोबर बरेच कोर्स किंवा पुस्तकांपेक्षा एखाद्या अनुभवी विद्यार्थ्यांचा सल्ला घेऊन कोणत्याही एका कोर्सपासून तयारीला लागा. त्यामुळे तुमचा गोंधळ होणार नाही.
अभ्यासाचे वेळापत्रक बनवा
कोणत्याही परीक्षेची तयारी करताना आधी अभ्यासाचे वेळापत्रक बनवा आणि आपले ध्येय केंद्रित ठेवून या वेळापत्रकाची अंमलबजावणी करायला सुरुवात करा.
आपले कच्चे दुवे ओळखा
जो विषय किंवा मुद्दा कठीण वाटतो, त्यावर अधिक लक्ष देऊन आपला कच्चा दुवा पक्का करण्याचा प्रयत्न करा.
गुणवत्तेकडे लक्ष द्या
तुम्ही किती प्रश्न सोडवीत आहात यापेक्षा तुम्ही ते कसे सोडवीत आहात हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे असे प्रश्न सोडवा जे कठीण असतील. कोणताही प्रश्न सोडून देण्यापेक्षा तो सोडविण्याचा प्रयत्न करा.
स्वतःचीच परीक्षा घ्या
एखाद्यावेळी स्वत:चीच परीक्षा घ्या. त्यामुळे तुम्ही किती पाण्यात आहात याचा अंदाज येईल. तुम्ही स्वतः:ची जितकी जास्त परीक्षा घ्याल तितके ते तुमच्यासाठीच हितकारक ठरेल.
या सोबतच आपल्या मित्रांशी यासंबंधी चर्चा करीत राहा आणि तयारीच्या आधुनिक तंत्राची माहिती ठेवा.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)